शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत बंटी-बबलीने केली मुस्लिम बांधवांची कोट्यावधी रूपयांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 21:53 IST

भिवंडी : शहरातील मुस्लिम बांधवांना ‘हलाल’च्या कमाईचे आकर्षण दाखवित कोट्यावधी रूपयांचा गंडा घालणाऱ्या बंटी-बबलीच्या विरोधात चौदा तक्रारदारांनी पोलीसांकडे तक्रार ...

ठळक मुद्देमुस्लिम बांधवांना दाखविले ‘हलाल’च्या कमाईचे आकर्षण१४ गुंतवणूकदारांची १ कोटी २ लाखांची फसवणूक केल्याची तक्रारगुंतवणूकदारांमध्ये कामगार,व्यापारी,डॉक्टर व मान्यवरांचा समावेश

भिवंडी: शहरातील मुस्लिम बांधवांना ‘हलाल’च्या कमाईचे आकर्षण दाखवित कोट्यावधी रूपयांचा गंडा घालणाऱ्या बंटी-बबलीच्या विरोधात चौदा तक्रारदारांनी पोलीसांकडे तक्रार केली असुन त्यामध्ये यंत्रमाग कामगार,कापडव्यापारी,डॉक्टर यांच्यासह अनेक मान्यवरांनी गुंतवणूक केल्याचे हळूहळू उघडकीस येत आहे.धार्मिकदृष्ट्या मुस्लिम बांधवांना व्याज अथवा अन्य अवैध मार्गांनी मिळणारा पैसा वर्ज असल्याने त्यांना लाखो रूपयांच्या गुंतवणूकीच्या व्यवसायातून हलालची कमाई मिळेल,असे आमिष दाखवून हिरा गोल्ड एक्झिम लि.कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. सन २०१३मध्ये इम्रान शेख व नुहिरा शेख या हैद्राबाद मधील जोडप्याने शहरातील हनुमानबावडी समोरील मिरॅकल मॉलमध्ये हिरा गोल्ड एक्झिम कंपनीचे कार्यालय सुरू करून धर्मिक मानसिकतेतून प्रचार सुरू केला.त्यामुळे कंपनीच्या योजनेत शहरातील सुमारे अडीच ते तीन हजार मुस्लिम बांधवानी कोट्यावधी रूपयांची आर्थिक गुंतवणूक केली.त्यामध्ये कामगार,व्यापारी,डॉक्टर व मान्यवरांचा समावेश आहे. गेल्या सहा सात महिन्यापासून गुंतवणूकदारांना नियमीत व्याज न मिळाल्याने त्यांनी गुंतवलेली रक्कम परत मागण्याचा तगादा सुरू केला. परंतू इम्रान व नुहिरा हे दोघे त्यांना ‘तारीख पे तारीख’ देत पैसे देणे टाळू लागले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे समजल्याने गुंतवणूकदारांनी कंपनीच्या कार्यालयांत वाद घालण्यास सुरूवात केली. गुंतवणूक दारांच्या तक्रारीला सामोरा जाता येत नसल्याने इम्रान शेख व नुहिरा शेख या दोघांनी कार्यालय सोडून पळ काढला. या प्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात दोघांच्या विरोधात भूसार मोहल्ल्यातील मोहम्मद अली इब्राहिम फकीह(३८)यांनी केलेल्या तक्रारीवरून पोलीसांनी मिरॅकल मॉलमधील कंपनीच्या कार्यालयांस सील केले. तर सध्या १४ गुंतवणूक दारांनी केलेल्या तक्रारीनुसार १ कोटी २ लाखांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. शहरातील गुंतवणूकदारांना ही घटना समजल्यानंतर ते तक्रारीसाठी पोलीस ठाणे गाठत आहेत, त्यामुळे फसवणूक झालेल्या रक्कमेचा आकडा वाढणार आहे.या कंपनीने देशांतील विविध भागात मुस्लिम बांधवांना आकर्षित करण्यासाठी कार्यालये उघडून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याची माहिती पोलीस सुत्राकडून मिळते.त्यामुळे शहरातील गुंतवणूक दारांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.

टॅग्स :BhiwandiभिवंडीCrime Newsगुन्हेगारी