शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
2
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी
3
Rahul Gandhi : राहुल गांधींनी मासे पकडण्यासाठी तलावात मारली उडी अन्...; Video तुफान व्हायरल
4
IND vs AUS : टिम डेविडची वादळी खेळी! पठ्ठ्यानं मोडला सूर्या दादाचा मोठा विक्रम
5
iPhone 16: आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर २५००० रुपये वाचवा; कुठं मिळतोय इतका स्वस्त?
6
"56 इंचाची छाती असून, अमेरिकेपुढे झुकतात", राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा
7
युक्रेनकडून रशियावर भीषण ड्रोनहल्ला, तुआप्से बंदरात घडवला मोठा विध्वंस, ऑईल टर्मिलन जळाले  
8
PM किसानचा २१वा हप्ता कधी येणार? मोठी अपडेट समोर! 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाहीत २००० रुपये
9
‘सत्याचा मोर्चा’त शरद पवारांचे विधान; शिंदे गटाचे नेते म्हणाले, “५० वर्ष सत्ता भोगली...”
10
“अजित पवार, शेतकऱ्यांनी जीवन संपवावे असे वाटते का तुम्हाला?”; प्रकाश आंबेडकरांचा सवाल
11
मुंबईतील कॉन्सर्टवेळी 'मिस्ट्री मॅन'सोबत दिसली मलायका अरोरा, नेटकरी म्हणाले, "अर्जुनपेक्षा भारी..."
12
"मोदी आणि अमित शाह यांना तर हरवू शकत नाहीत, म्हणून..."; खर्गेंच्या संघावरील बंदीच्या मागणीवर बाबा रामदेव यांची तिखट प्रतिक्रिया
13
IND-W vs SA-W Final : टॉस आधी पावसाची बॅटिंग! मेगा फायनलमध्ये ५०-५० षटकांचा खेळ होणार का?
14
रेखा झुनझुनवाला यांची हिस्सेदारी असलेल्या कंपनीला मोठी ऑर्डर; शेअर्स रॉकेट वेगाने धावणार?
15
तंत्रज्ञानाची किमया! चित्रपट पाहत असताना...; Apple वॉचमुळे वाचला २६ वर्षीय तरुणाचा जीव
16
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
17
आर्थिक व्यवहारावरून वाद, राष्ट्रवादीच्या नेत्याने रोखली शिंदे सेनेच्या नेत्यावर बंदूक
18
Crime: कुटुंबासाठी काळ ठरला नवरा; बायको मुलीसह नातेवाईकाचा विळ्याने चिरला गळा, कारण काय?
19
तुमच्या बचतीवर बक्कळ नफा! ही घ्या ३ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांची यादी
20
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा

वीकेंड लॉकडाऊनच्या भीतीने ठाणेकरांनी केला दुधाचा अतिरिक्त साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:39 IST

ठाणे : वीकेंड लॉकडाऊनच्या भीतीने ठाणेकरांनी शुक्रवारच्या सायंकाळीच दुधाचा अतिरिक्त साठा करून ठेवला. शनिवार-रविवार दूध येणार नसल्याची भीती ठाणेकरांच्या ...

ठाणे : वीकेंड लॉकडाऊनच्या भीतीने ठाणेकरांनी शुक्रवारच्या सायंकाळीच दुधाचा अतिरिक्त साठा करून ठेवला. शनिवार-रविवार दूध येणार नसल्याची भीती ठाणेकरांच्या मनात होती. त्यामुळे त्यांनी दोन दिवसांच्या दुधाची खरेदी केल्याचे ठाणे शहर दूध व्यावसायिक कल्याणकारी संस्थेने सांगितले.

लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून या आठवड्यातील हा पहिला वीकेंड लॉकडाऊन होता. अत्यावश्यक सेवा वगळता या दोन्ही दिवशी कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे या दोन्ही दिवशी दूधदेखील मिळणार नाही, ही भीती ठाणेकरांना होती. म्हणून त्यांनी आपापल्या रोजच्या दूध विक्रेत्यांना याबद्दल विचारणा केली. काही जणांनी त्यांना शनिवार-रविवार या दोन्ही दिवसांचे दूध आणून द्यायला सांगितले, तर काहींनी दुकानांत, दूध डेअरी येथे जाऊन ते विकत घेतले.

ठाणे शहरात दररोज जवळपास साडेचार ते पाच लाख लिटर दूध येते. परंतु, शुक्रवारी सायंकाळी जास्त दुधाची खरेदी झाली असल्याचे संस्थेचे सहसचिव पांडुरंग चोडणेकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

----------------------

सोसायट्यांनी दूध विक्रेत्यांना कोरोना चाचणी करण्याचे बंधनकारक केले आहे. सोसायटींनी चाचणी करण्याची सक्ती केल्यास त्यांना दूध टाकणार नाही, अशी भूमिका संस्थेने घेतल्याचे चोडणेकर यांनी सांगितले. ठाणे महापालिकेने असा आदेश काढल्याचे सोसायटी आम्हाला सांगत आहे असेही ते म्हणाले. याबाबत ठाणे महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी म्हणाले की, प्रत्येकाने कोरोनाचाचणी करणे बंधनकारक आहे. कारण हा प्रत्येकाच्या जिवाचा प्रश्न आहे. व्यवसायही करायचा आहे आणि चाचणी नको, असे होत नाही. दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, तसेच दूध व्यवसाय हा अत्यावश्यक सेवेत मोडत आहे, त्यामुळे कोरोनाचाचणी आवश्यक आहे.