शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे काँलेजचे लाखोंच्या किमतीचे बेंच पावसात भिजून  खराब होण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 19:39 IST

लाखो रुपये किंमतीचे शेकडो बेंचेस इमारतीच्या गच्चीवर हमालांतर्फे अस्तव्यस्त ठेवले आहेत. या दरम्यान बहुतांशी तुटले आहेत. छत असलेल्या गच्चीवर चौबाजूंनी पावसाचे पाणी शिरुन बेंचेस खराब होण्याची भीती, या कालेजचे प्राध्यापक बिपीन धुमाळे यांनी व्यक्त केली आहे. 

ठाणे : विलगीकरण कक्ष उभारण्यासाठी विद्या प्रसारक मंडळाचे ठाणे कॉलेज प्रशासनाने जबरदस्ती ताब्यात घेतले आहे. त्यातील लाखो रुपये किंमतीचे शेकडो बेंचेस इमारतीच्या गच्चीवर हमालांतर्फे अस्तव्यस्त ठेवले आहेत. या दरम्यान बहुतांशी तुटले आहेत. छत असलेल्या गच्चीवर चौबाजूंनी पावसाचे पाणी शिरुन बेंचेस खराब होण्याची भीती, या कालेजचे प्राध्यापक बिपीन धुमाळे यांनी व्यक्त केली आहे. 

शेकड्यांनी बेंचेस ठेवलेल्या गच्चीवर छप्पर आहे. पण गच्ची दोन्ही बाजूंनी उघडी आहे. एक मोठा पाऊस बेंचेस भिजवून टाकणार आहे. या बेंचेसची किंमत लाखो रुपये आहे. बेंचेस तुटायलाही लागले आहेत. रस्त्यावरची भेळेची गाडी ताब्यात घेतात तसे  महाविद्यालय ताब्यात घेण्यात आले आहे. शैक्षणिक संस्था ताब्यात घ्या म्हणून आदेश देणाऱ्या या नोकरशहा विरोधात हा एका शैक्षणिक  संस्थेचा आक्रोश असल्याचे धुमाळे यांनी लोकमतला सांगितले. या सत्तालोलुप अधिकारशाहीची ही मिजास सर्वथा चुकीची असल्याचे ही ते कळकळीने सांगतात.          विद्या प्रसारक मंडळाचा परिसर हा "ज्ञानद्वीप " नावाने प्रसिद्ध आहे. ठाण्याचे सांस्कृतिक संचित या संस्थेने घडवले आहे. साधारणतः 15 हजार विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. त्यांच्या निकालाचे काम सुरू असताना अचानक अशी कार्यवाही प्रशासनाने करावयास नको होती.  डॉ. बेडेकरांची व त्यांच्या कुटुंबाची सामाजिक बांधीलकी संपूर्ण ठाण्यातील जनता जाणते. त्यांनी उभं केलेलं हे शैक्षणिक संकुल संस्कार व मूल्यशिक्षणाचे मानबिंदू आहे. मात्र याचा कुठलाही विचार न करता अधिकारांचा गैरवापर करून तारतम्य विहीन वागणुकीचा निषेध केला गेला पाहिजे, असे ही ते संतापून सांगत आहेत.  

    इतिहासाच्या पुस्तकात प्लेगची साथ व इंग्रजी सोजिरांची जुलमी वागणूक वाचली होती. तीच मिजास जर आपल्या प्रशासनात बसलेल्या लोकांची असेल तर शिक्षणाचे व शिक्षण संस्थाचे पावित्र्य टिकणार नाही. 'विद्या ददाति विनयं" असं लहानपणी वाचलं होते. विद्या विनय देते म्हणे, मात्र विद्यासंपन्न, धनसंपन्न व अधिकार संपन्न व्यक्तींनी आपल्याच पुढच्या पिढीची आधुनिक तीर्थक्षेत्रे असलेल्या शिक्षण संस्थांची काळजी मोठ्या विनयाने घ्यावी ही सामान्य नागरिकांची इच्छा असते. या मूलभूत जीवन मूल्यालाच पायदळी तुडवले जात असेल तर भविष्य खूप चांगले आहे, असे म्हणता येणार नाही,  असे याच जोशी बेडेकर महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक डाळ. प्रशांत धर्माधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Schoolशाळाthaneठाणे