शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

चार कोटींचा निधी परत जाण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2019 01:11 IST

विकासकामांसाठी निधी मिळत नसल्याची तक्रार नगरसेवकांकडून सुरू असते. परंतु जिल्ह्यातील दोन नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निष्काळजी व दुर्लक्षितपणामुळे सुमारे चार कोटींचा निधी पडून आहे.

- सुरेश लोखंडेठाणे : विकासकामांसाठी निधी मिळत नसल्याची तक्रार नगरसेवकांकडून सुरू असते. परंतु जिल्ह्यातील दोन नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निष्काळजी व दुर्लक्षितपणामुळे सुमारे चार कोटींचा निधी पडून आहे. मागणी व कामांचे प्रस्ताव प्राप्त नसल्यामुळे तो यंदाही परत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.जिल्ह्यात अंबरनाथ नगरपालिका असून कुळगाव-बदलापूर नगर परिषद आहे. याशिवाय, मुरबाड आणि शहापूर नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील विकासकामांसाठी जिल्हा नियोजन समितीकडे सुमारे १२ कोटींचा निधी आहे. त्याचे तीन टप्प्यांत वाटप होण्याची अपेक्षा आहे. त्यातील शेवटच्या टप्प्याच्या सुमारे चार कोटींच्या मागणीसाठी संबंधित नगरपालिका, नगर परिषद व नगरपंचायतींकडून अद्याप विकासकामांचे प्रस्ताव आलेले नसल्याची गंभीर बाब नियोजन समितीच्या (डीपीसी) बैठकीस उघड झाली आहे. यामुळे यंदाही हा निधी परत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.या टप्प्यातील सुमारे चार कोटी रुपयांचे वितरण करण्यासाठी प्रशासन तत्पर असल्याची बाब डीपीसीच्या बैठकीत उघड झाली. पण, मार्चअखेरपर्यंत नगरपालिका, नगर परिषदांच्या प्रशासनाकडून प्रस्ताव येणे शक्य नाही. या निष्काळजीमुळे राखीव १२ कोटींमधील वितरित होणाऱ्या आठ कोटींपैकी चार कोटी वाटप झाले. उर्वरित चार कोटी रुपये मात्र अद्याप पडून आहेत. नगरोत्थानाच्या नावाखाली डीपीसीद्वारे दिल्या जाणाºया या निधीची मागणी चार कोटी याप्रमाणे तीन टप्प्यांत होणे अपेक्षित आहे. गेल्या वर्षापासून हा निधी नगरपालिका, नगरपंचायतींना मिळत आहे. नावीन्यपूर्णसारख्या नवीन योजना राबवण्यासाठी हा निधी दोन वर्षांपासून राखीव ठेवला जातो. मागील वर्षाचा निधीदेखील मार्चनंतर शासनजमा झाल्याचे निदर्शनास आले. यंदाही सुमारे चार कोटी रुपये संबंधित नगरपालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शासनजमा होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.>कामे मंजूर, निविदा नाही!नगरपालिका, नगरपंचायतींसाठी सुमारे १२ वर्षांपासून हेड तयार करण्यात आले होते. त्यात केवळ हजार रुपये जमा होत असत. पण, आता नगरोत्थानाच्या नावे दोन वर्षांपासून १२ कोटी रुपये ठेवले जात आहेत.पण, या निधीची मागणी होत नसल्याची खंत जिल्हा नियोजन अधिकारी खंडारे यांनी डीपीसी सभागृहात व्यक्त केली. या निधीतून मागील वर्षी कामे मंजूर केली, पण या कामांच्या निविदा संंबंधित नगरपालिकांच्या प्रशासनाने काढल्याच नाहीत. यामुळे निधी खर्च झाला नाही. यावर्षीदेखील १२ कोटी ठेवण्यात आले.त्यातील आठ कोटी द्यायचे आहेत. त्यातील चार कोटी दिले, पण उर्वरित चार कोटी शासनजमा होण्यापूर्वी प्रस्ताव पाठवण्याची अपेक्षा आहे. यंदाच्या नियोजनात मिळणाºया वाढीव निधीतून आवश्यक ठिकाणी फायर ब्रिगेडसाठी निधी देण्याची चर्चा डीपीसीत झाली आहे.