शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण-शीळ महामार्गावरील ‘त्या’ दुभाजकांमुळे अपघाताची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 00:45 IST

नव्या दुभाजकांचे काम पूर्ण, वाहतुकीलाही अडथळा

डोंबिवली : कल्याण-शीळ महामार्गावर काटई सिग्नलनंतर शीळकडे जाताना देसाई पुलानजीक रस्त्यावर नवे दुभाजक बसवण्याचे काम एमएसआरडीसीने पूर्ण केले आहे. मात्र, त्याठिकाणी जुने दुभाजक नव्या दुभाजकाच्या बाजूलाच ठेवल्याने अपघाताची भीती व्यक्त होत आहे. वाहतूककोंडीमुळे प्रवासादरम्यान वाहनचालक त्रस्त असतानाच जुने दुभाजक अडथळा ठरत आहेत.वाहतुकीला अडचण होऊ नये, यासाठी ते तातडीने काढावेत, अशी मागणी वाहनचालक करत आहेत. नव्याने केलेल्या कामाला वाहनांमुळे धक्का लागू नये, यासाठी काही अंतरांवर जुने दुभाजक ठेवण्यात आले आहेत. याठिकाणी गर्दीच्या वेळेत अपघात झाल्यास त्यात वाहनांचे आणि वाहनचालकांचे नुकसान होऊ शकते, अशी भीती परिसरातील वाहनचालकांनी व्यक्त केली. पलावा परिसरातून वाहन कल्याणच्या दिशेने काढताना काटई पुलाच्या चढावावर रिक्षा चुकीच्या पद्धतीने उभ्या राहतात. त्याचा त्रास वाहनचालकांना होत असतानाच आता दुभाजक ठेवल्यानेही अडथळे होत आहेत. त्या दुभाजकांना वाहन लागू नये, यासाठी काही विशिष्ट अंतरावरून वाहने नेली जात आहेत. विशेषत: रात्री पथदिवे नसल्याने वाहनांचा वेग त्या परिसरात मंदावल्याचे सांगण्यात आले.देसाई पुलानजीक दुभाजक नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. बहुतांशी ते पूर्ण झाले आहे. नव्या दुभाजकांच्या मजबुतीसाठी काही अंतरावर जुने दुभाजक ठेवण्यात आले होते. ते लवकरच काढण्यात येतील.- अनिरुद्ध बोर्डे, उपअभियंता, एमएसआरडीसी

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा