शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
2
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
3
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
4
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
5
समलैंगिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् शेवट...; मुंबईतील ३ घटना, ३ मृत्यू, नेमकं काय घडले?
6
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
7
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
8
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
9
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
10
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे
11
पंढरीचे ‘एआय’ वारकरी! AI ने केली २७ लाख लोकांची गर्दी मोजण्याची किमया
12
निवडणूक आयोग जनतेला मूर्ख समजतो की काय?; रोखठोक प्रश्न विचारणं आवश्यक बनलंय
13
महासंचालकांचे परिपत्रक सर्व पोलिसांवर बंधनकारक नाही का?; अपूर्ण केस डायरीवरून उच्च न्यायालय संतापले
14
मृत घोषित केलेले बाळ अंत्यसंस्कारावेळी रडले; अंबाजोगाईच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार
15
‘आई’ व्हा! शाळकरी मुलींनाही 'या' देशानं दिलं आमिष; मुलं जन्माला घातली तर मिळणार १ लाख
16
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
17
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
18
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
19
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
20
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ

भेसळयुक्त मावा पकडण्यासाठी एफडीएच्या धाडी

By admin | Updated: October 26, 2015 23:56 IST

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर उत्साह विरजण पडू नये. यासाठी एफडीएचे भरारी पथक सज्ज झाले असून भेसळयुक्त माव्यापासून बनविणाऱ्यांना या पथकाने चांगलाच दणका दिला आहे

पेण : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर उत्साह विरजण पडू नये. यासाठी एफडीएचे भरारी पथक सज्ज झाले असून भेसळयुक्त माव्यापासून बनविणाऱ्यांना या पथकाने चांगलाच दणका दिला आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार व वरिष्ठ कार्यालयाकडून जारी झालेल्या परिपत्रकानुसार रायगड युनिटच्या पेण येथील एफडीएच्या सहाय्यक आयुक्त व अन्न सुरक्षा अधिकारी वर्गाने रायगड जिल्ह्यातील २६ दुकानांवर छापे मारुन ६९ अन्न नमुने तपासणीसाठी जप्त केल्याने मिठाई दुकानदार व अन्न पदार्थ विक्री व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.१ सप्टेंबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत एफडीएची धडक मोहीम असून यासाठी भरारी पथके मिठाई विक्रेत्यांवर वॉच ठेवून आहेत. सर्वात मोठा सण असलेल्या दिवाळीचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी माव्यापासून बनविलेली मिठाई मोठ्या प्रमाणावर भेट दिली जाते. यासाठी गल्लीबोळात हलवाई, मिठाई व जंकफूडची दुकाने थाटली जाऊ लागली आहेत. या दुकानातील अन्न पदार्थाची गुणवत्ता व भेसळीचे प्रमाण याबाबत सामान्य जनतेला काहीच माहिती नसते. अशावेळी सणांच्या काळात चढ्यादराने मिठाई व अन्नपदार्थांची विक्री करुन उखळ पांढरे करणाऱ्या विक्रेत्यांना एफडीएच्या पथकाचा चांगला दणका मिळणार आहे.दिवाळी सणात परराज्यातून येणारे पॅकींग फूड, खवा, मावा, शितपेय व इतर अन्न पदार्थांमध्ये भेसळीचे प्रमाण असते. शुध्दतेची गॅरंटी देणारे तेल, वनस्पती तूप, दूधजन्य पदार्थ, मसाले व इतर अन्नपदार्थ चांगले आकर्षक वेस्टन लावून विक्रीचा खप वाढविण्यावर भर असतो. या साऱ्यांनाच वेसण म्हणून अन्न सुरक्षा मानके कायद्याअंतर्गत अन्न नमुन्याची तपासणी करण्यासाठी एफडीएची धडक मोहीम आहे.पेण रायगड युनिटचे अन्न सुरक्षा अधिकारी, यांनी जिल्ह्यात यासाठी धडक मोहीम हाती घेतली असून या पथकात सहाय्यक अन्न आयुक्त भ. ऊ. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न निरीक्षक आर. एस. बोडके, ग. वि. जगताप, आर. पी. कुलकर्णी, बी. ए. बाळाजी, प्र. शि. पवार व सु. ना. जगताप यांनी २६ दुकानांवर धाडी टाकून ६९ अन्न नमुने ताब्यात घेऊन तपासणीसाठी पाठविले आहेत. यापैकी काही नमुने तपासणी होवून आले आहेत. यातील माव्याचे नमुने अप्रमाणीत आल्याने अधिकारी सतर्क झालेत. तपासणीसाठी घेतलेल्या अन्न नमुन्यात तेलाचे २२, मिठाईचे २५, वनस्पती तूप १०, इतर अन्न पदार्थ ६, मसाले ४ व नमकीन पदार्थ २, दूधजन्य १ असा समावेश आहे.अन्न सुरक्षा मानके कायद्यानुसार, अन्न शिजविण्यासाठी आणि विकण्यासाठी एफडीएची नोंदणी परवाना असणे बंधनकारक आहे. त्याचीच एफडीएचे पथक चौकशी तथा तपासणी करीत आहेत. नोंदणी परवाना नसलेल्या विक्रेत्यांना कडक कारवाईला सामोरे जाव लागणार आहे. (वार्ताहर)