शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

फटाकेविक्रेत्यांना परवानगीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 23:32 IST

दीवाळी तोंडावर आली तरी कल्याण डोंबिवली महापालिकेने फटाके विक्रीसाठी विक्रेत्यांना अद्याप परवानगीच दिलेली नाही.

- जान्हवी मोर्ये डोंबिवली : दीवाळी तोंडावर आली तरी कल्याण डोंबिवली महापालिकेने फटाके विक्रीसाठी विक्रेत्यांना अद्याप परवानगीच दिलेली नाही. ऐनवेळी परवानगी मिळाल्यास व्यवसाय करायचा तरी कसा, असा प्रश्न फटाके विक्रेत्यांकडून उपस्थित होत आहे.फटाके विक्रेते धनंजय चाळके यांनी सांगितले की, फटाके विक्रीची परवानगी तीन ते चार महिने आधी द्यावी अशी फटाके विक्रेत्यांची मागणी असते. मात्र नेहमीच परवानगी ऐनवेळी दिली जाते. त्यामुळे विक्रेते संभ्रमात असतात. यावेळीही दिवाळीत तशीच परिस्थिती आहे. काही विक्रेते घरातील दागिने गहाण ठेवून दीड ते दोन लाख रुपयांचा माल विक्रीसाठी घेतात. काही जणांनी माल अगोदरच विकत घेतला आहे. त्याना विक्रीसाठी अद्याप परवानगीच देण्यात आलेली नाही. त्यामुळे खरेदी केलेल्या मालाचे करायचे काय, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. महापालिका मुख्य बाजारपेठेतील जागा विक्रेत्यांना देत नाही. शहराबाहेर जागा दिल्याने त्याठिकाणी वीज, पाण्याची सुविधा विक्रेत्यांनाच करावी लागते. पोलिस व अग्निशमन दलाच्या परवानगीसाठी जास्त त्रास होत नाही. मात्र महापालिकेकडून अडवणूक केली जाते. नियमानुसार परवानगी मागणाऱ्यांना नाहक त्रास दिला जातो. गाळा घेऊन व्यवसाय करण्यात आणि मैदानात व्यवसाय करण्यात बराच फरक आहे. याचा प्रशासनाने विचार करण्याची गरज आहे.फटाके विक्रेते अशोक हनकारे यांनी सांगितले की, परवानगी मिळाली नाही तर स्टॉल्स न लावण्याचा पवित्रा काही विक्रेत्यांनी घेतला आहे. स्टेशनजवळ असलेल्या मैदानात जागा दिली जात नाही. पश्चिमेतील भागशाळा मैदान हे स्टेशनपासून जरा जवळ असले तरी क्रीडासंकुल स्टेशनपासून लांब आहे. तेथे ग्राहक येतीलच असे नाही. अनेकदा स्टॉल्स लावून व्यवसाय होईलच याची हमी नसते. कोर्टाकडून बंदी नसताना महापालिकेकडून अडवणुकीचे धोरण राबविले जात आहे. पूर्वेतील नेहरु मैदान, स. वा. जोशी शाळेचे प्रांगण विक्रेत्यांना दिले पाहिजे. ही जागा स्टेशनपासून जवळ आहे. डोंबिवलीत ५० स्टॉल्स लावले जातात. दिवाळीत फटाक्यांच्या बाजारपेठेला तसाच कमी प्रतिसाद आहे. दिवाळीत अनेक लोक सुट्टी म्हणून पर्यटनासाठी पळतात. त्यामुळे गेल्या वर्षांपासून फटाक्यांच्या विक्रीवर परिणाम झाला आहे.परवानगी सरसकट नाकारली नाहीडोंबिवली पश्चिमेतील भागशाळा मैदानात ३५ दुकानदारांना फटाके विक्रीची परवानगी दिली असल्याची माहिती पालिका अधिकाºयांनी दिली. तेथील उपलब्ध जागा लक्षात घेता आणखी दुकानदारांना परवानगी देणे शक्य नाही. काही दुकानदार राहिले असतील, तर त्यांना कुठे समावून घ्यायचे, याचा विचार सुरु आहे.पोलिस, अग्नीशमन दल यांच्या निकषांच्या आधारे फटाके विक्रेत्यांना परवानगी दिली जाते. या निकषांची पूर्तता करणाºयांना नक्कीच परवानगी दिली जाणार आहे. जागा किती उपलब्ध आहे याचाही विचार केला जातो. काहींची परवानगी राहिली असल्यास सर्वांनाच सरसकट नाकारली असेहोत नाही.

टॅग्स :fire crackerफटाकेkdmcकल्याण डोंबिवली महापालिका