पोटच्या मुलीवर बापाचा अत्याचार

By admin | Published: November 6, 2016 03:54 AM2016-11-06T03:54:31+5:302016-11-06T03:54:31+5:30

पोटच्या अल्पवयीन मुलीला अश्लील चित्रण दाखवून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या पित्यासह तिच्या सावत्र आईला नौपाडा पोलिसांनी शनिवारी अटक केली. नराधम पिता

The father's torture on the stomach's daughter | पोटच्या मुलीवर बापाचा अत्याचार

पोटच्या मुलीवर बापाचा अत्याचार

Next

ठाणे : पोटच्या अल्पवयीन मुलीला अश्लील चित्रण दाखवून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या पित्यासह तिच्या सावत्र आईला नौपाडा पोलिसांनी शनिवारी अटक केली. नराधम पिता माजी सैनिक असून, सध्या तो एका बँकेच्या मुख्यालयात सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत असल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी दिली.
पीडित मुलगी ही सावत्र आई आणि नराधम पित्यासह खोपट हंसनगर येथे राहते. मुलीच्या आईच्या निधनानंतर तिच्या वडिलांनी दुसरे लग्न करून ते ठाण्यात राहत आहेत. मध्यंतरी घरात काम करण्यासाठी नराधम पित्याने तिला ठाण्यात ठेवले आणि तिच्या लहान भावांना तो बिहारमध्ये गावी ठेवून आला होता. महिन्यापासून तो धमकावून तिच्यावर अत्याचार करत होता. या त्रासाला कंटाळून तिने शनिवारी संधी मिळताच शेजारच्या महिलेकडे मदत मागितली. ती कोणाशी तरी बोलते हे पाहून तिच्या सावत्र आईने तिला घरात नेले आणि मारहाण करीत खोलीत कोंडले.
नंतर तिने घराच्या गॅलरीतून रडत-रडत रस्त्यांवरून ये-जा करणाऱ्यांकडे मदत मागण्यास सुरुवात केली. ते पाहून काही जणांनी विचारणा केली. तेव्हा हा प्रकार पुढे आला. स्थानिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तिची तक्रार दाखल करीत अत्याचाराचा गुन्हा दाखल करीत तिच्या वडिलांसह सावत्र आईला अटक केली. (प्रतिनिधी)

Web Title: The father's torture on the stomach's daughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.