शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना नगरसेविकेचे आजपासून उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2019 23:43 IST

मीरा-भाईंदर महापालिका प्रशासन सत्ताधारी भाजपाच्या दबावाखाली विकासकामांना खो घालत असल्याचा आरोप करत प्रभाग तीनमधील शिवसेनेच्या नगरसेविका नीलम ढवण उद्यापासून आयुक्त दालनाबाहेर बेमुदत उपोषणास बसणार आहेत.

भाईंदर : मीरा-भाईंदर महापालिका प्रशासन सत्ताधारी भाजपाच्या दबावाखाली विकासकामांना खो घालत असल्याचा आरोप करत प्रभाग तीनमधील शिवसेनेच्या नगरसेविका नीलम ढवण उद्यापासून आयुक्त दालनाबाहेर बेमुदत उपोषणास बसणार आहेत. तर कंत्राटी कामगारांसह स्थायी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर प्रशासन चालढकल करत असल्याच्या निषेधार्थ श्रमजीवी कामगार संघटना धरणे आंदोलन करणार आहे.आरएनपी पार्क परिसरातील पालिका भूखंडावर खुली व्यायामशाळा व लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी बसविण्याच्या ढवण यांच्या नगरसेवक निधीतील कामाला प्रशासनाने मंजुरी दिली. भाजपा नगरसेवकांच्या पोटदुखीमुळे प्रशासनाने मात्र ती रद्द केली. ही जागा एका स्थानिक विकासकाच्या घशात घालण्याचे कटकारस्थान रचले जात असतानाही प्रशासन ढिम्म झाल्याचा आरोप ढवण यांनी केला आहे.प्रशासन सत्ताधाºयांच्या दबावाखाली कारभार करत असून या गैरकारभाराविरोधात ढवण या आयुक्त दालनाबाहेर बेमुदत उपोषण करणार आहेत. मागील काही दिवसांपासून शिवसेना-भाजपामध्ये विविध विषयांवरून वाद सुरू आहेत. यामुळे विकासकामे होत नसल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. यावर तोडगा काढण्याची मागणी होत आहे.आयुक्तांकडून समजवण्याचा प्रयत्नआयुक्त बालाजी खतगावकर यांनी आंदोलने होऊ नयेत यासाठी ढवण व विवेक पंडित यांच्याशी संपर्क साधला. त्यांना प्रलंबित कामे व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले असता आंदोलकांनी ते अमान्य करत आंदोलन छेडण्यावर ठाम असल्याचे स्पष्ट केले.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक