शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Khadse : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
2
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
3
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
4
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
5
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
6
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
7
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
8
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
9
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
10
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
12
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
13
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
14
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
15
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
16
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
17
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
18
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
19
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
20
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले

आधारवाडीची आग अजून आठवडाभर, धुराचा त्रासही चार दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 03:33 IST

आधारवाडी डम्पिंगला ग्राऊंडला शनिवारपासून आग लागण्याच्या घटना घडत आहेत. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाने विशेष टीम तयार केली आहे.

कल्याण : आधारवाडी डम्पिंगला ग्राऊंडला शनिवारपासून आग लागण्याच्या घटना घडत आहेत. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाने विशेष टीम तयार केली आहे. आग विझवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. या आगीचे स्वरुप इतर आगीपेक्षा वेगळे असल्याने ती आटोक्यात आणण्यासाठी किमान आठ दिवसाचा अवधी लागेल. तसेच नागरिकांना चार दिवस धुराचा त्रास सहन करावा लागेल, अशी माहिती आयुक्त पी. वेलरासू यांनी सोमवारी दिली.डम्पिंगच्या आगीवरुन कल्याण-डोंबिवलीत राजकीय रण पेटले असून आयुक्तांना हटविण्याची मागणी सुरू झाली आहे. राजकीय पक्षाच्या शिष्टमंडळाना न भेटता आयुक्तांन दिवसभर डम्पिंगची आग विझवण्याच्या कामात व्यस्त होते. त्यानंतर यासंकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन कामाचा तपशील दिला. यापूर्वी २००९ आणि २०१६ ला डम्पिंगला आग लागल्याचा संदर्भही देण्यात आला.आयुक्त वेलरासू यांनी सांगितले, डम्पिंगच्या आगीचा पहिला कॉल शनिवारी आला. आग विझवण्यासाठी भिवंडी, नवी मुंबई महापालिकेतून अग्निशमन दलाच्या गाड्या पाचारण करण्यात आल्या. तसेच काही पाण्याचे टँकर मागविले गेले. पण डम्पिंग ग्राऊंडचा परिसर मोठा आहे. नगरपरिषद असल्यापासून तेथे कचरा टाकला जात आहे. आजमितीस त्याठिकाणी २५ मीटर कचºयाचा डोंगर आहे. १५ एकर जागेत हे डम्पिंग ग्राऊंड असल्याने आगीवर इतक्या लवकर नियंत्रण मिळविता येणार नाही. किमान आठ दिवस त्यासाठी काम करावे लागेल. सध्या खाडीत पाईप टाकून पाणी घेतले जात आहे. तसेच आधारवाडी सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून पाणी घेऊन आग विझविली जात आहे. डम्पिंगची आग विझविण्यासाठी रस्ता तयार केला आहे. नदी, खाडी आणि साठेनगर या तिन्ही बाजूने आग विझविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्या कामासाठी तीन उपायुक्त आणि तीन कार्यकारी अभियंत्याची टीम कार्यरत आहे. तसेच अग्निशमन दलाच्या गाड्या पाण्याचा मारा करुन आग विझविण्याचे काम करीत आहेत.>प्रशासन आगीविषयी गंभीरकाही लोकांची रविवारी भेट घेतली तेव्हा दम्याचा त्रास असलेले दोन जण भेटले. त्यांना धुराचा त्रास अधिक झाला. त्यांना धुरापासून दूर हलविण्याचा सल्ला दिला. त्याचा विपर्यास करुन काहींनी आयुक्तांनी स्थलांतर करायला सांगितले असे पसरविले. वास्तविक पाहता त्यात काहीच वाईट उद्देश नव्हता. कोणी कोणाचे बोलणे कसे घेईल, हे सांगणे कठीण आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम प्रशासनाकडून केले जात आहे. त्यामुळे प्रशासन गंभीर नाही, असे म्हणणे चुकीचे ठरेल. आगीच्या धुराचा आणि डम्पिंगचा प्रचंड त्रास नागरिकांना होतो, हे मला मान्य आहे. नागरिकांनी आत्तापर्यंत जसे प्रशासनाला सहकार्य केले. त्याप्रमाणे आणखी आठ दिवस सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्तांनी केले.>आग मिथेन वायूमुळे?डम्पिंगला आग का लागली, याचे खरे कारण अद्याप समोर आलेले नाही. अग्निशमन दलाच्या अधिकाºयांच्या मते, कचरा प्रचंड असल्याने त्यातून उन्हाळ््यात मोठ्या प्रमाणात मिथेन वायू तयार होतो.तो ज्वलनशील असल्याने सूर्यकिरणाच्या संपर्कात आल्यावर पेट घेतो. त्यामुळे आग लागते. असे असले, तरी आगाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.पाण्याचा मारा करुन आग विझविली जात असली, तरी ती अत्यंत खोलवर असल्याने पाण्याचा मारा थांबताच पुन्हा उग्र स्वरुप धारण करते. त्याचबरोबर वाहत्या वाºयामुळे आगीचे स्वरुप भीषण होेते. म्हणून पाण्याचा मारा सतत सुरु ठेवण्यात आल्याचे आयुक्त वेलरासू यांनी सांगितले.