शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका मुख्यालय बाहेर दिव्यांगांचे आमरण उपोषण

By धीरज परब | Updated: September 13, 2023 19:46 IST

दिव्यांगांवर अन्याय आणि अत्याचार केला जातोय असा आरोप यावेळी आंदोलकांनी केला . 

मीरारोड - विविध मागण्यांसाठी मीरा भाईंदर महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर प्रहार संघटनेच्या वतीने दिव्यांगांनी आमरण उपोषण सुरु केले आहे .  

प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने दिव्यांग क्रांती आंदोलनाचे महाराष्ट्र महासचिव डॉ . रामदास खोत , मीरा भाईंदर अध्यक्ष सुदाम अहिरे , महिला अध्यक्ष काजल नाईक , कार्याध्यक्ष बाबाजी भिसे , उपाध्यक्ष गौरव खैरनार आदींसह दिव्यांगांनी १३ सप्टेंबर रोजी महापालिके बाहेर आंदोलन सुरु केले . गेल्या अनेक वर्षां पासून महापालिकेस पत्र व्यवहार करून देखील कार्यवाही केली जात नाही . दिव्यांगांवर अन्याय आणि अत्याचार केला जातोय असा आरोप यावेळी आंदोलकांनी केला . 

शहरात नाक्या नाक्यावर सेल्फी पॉईंट साठी काही कोटी खर्च केले . परंतु दिव्यांगांना उपजीविकेसाठी स्टॉल देण्यास मात्र पालिका आडकाठी आणते . दिव्यांग मूकबधिर यांना शाळे साठी मुंबईत जावे लागते . शहरात सुमारे साडेचार हजार दिव्यांग असून त्यांच्यासाठी मीरा भाईंदर शहरात शाळा सुरु करण्यास पालोक टाळाटाळ करत आली आहे . 

मीरारोडच्या बेव्हर्ली पार्क येथे १५ वर्षां पेक्षा जास्त काळा पासून दिव्यांग रहात रहात असून त्यांना शासन धोरणा प्रमाणे ३७५ चौ. फु. चे पक्के घर देण्या ऐवजी झोपड्या तोडण्याच्या नोटीस पालिका देते . काही दिव्यांगांना तात्पुरत्या स्वरूपात इमारतीत शिफ्टिंग सिली असली तरी इमारतीची लिफ्ट नेहमी बंद असणे , अस्वच्छता आदी कारणांनी त्यांचे हाल होत आहेत . त्यामुळे दिव्यांगांना आवश्यक सुविधांची घरे देण्याची मागणी असल्याचे आंदोलक म्हणाले . दिव्यांगांना रोजगार देणे , फेरीवाला पावती माफ करणे , दिव्यांगांना उपकरणे व वाहने द्यावीत अशा मागण्या केल्या . 

महापालिकेच्या वतीने अतिरिक्त आयुक्त डॉ . संभाजी पानपट्टे यांनी आंदोलकांची भेट घेऊन चर्चा केली . मात्र ठोस आश्वासन मिळाले नसल्याने आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले . 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरmira roadमीरा रोड