शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेत ठाण्याचा मयंक चाफेकर ठरला वेगवान जलतरणपटू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 19:22 IST

ठाण्यातील खेळाडू विविध स्पर्धेत चमकदार कामगिरी करत आहेत. त्यातच,त्यांनी आता जलतरण स्पर्धेत ही असा ठसा उमठवला आहे. राज्यस्तरीय स्पर्धा ठाण्यातील खेळाडू गाजवताना दिसत आहे.

ठळक मुद्देसलग तीन वर्षे स्पर्धेत प्रथमस्टारफिशने या स्पर्धेत विजेतेपदाची हॅट्ट्रिक

ठाणे : मालवण येथे १७ डिसेंबर रोजी झालेल्या आठव्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेत सलग तीन वर्षे ठाण्यातील मयंक चाफेकर याने पाच किमी प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. हे अंतर त्याने या वर्षी अवघ्या ४७ मिनिटांत पार करत वेगवान जलतरणपटूचा किताब पटकावला आहे. त्याचबरोबर त्याने गतवर्षातील विक्रम एक मिनिटाने मागे टाकून नवीन विक्रमाला गवसणी घातली. तर, स्टारफिशने या स्पर्धेत विजेतेपदाची हॅट्ट्रिक साधली.एकूण १० गटांत ही स्पर्धा पार पडली. या वेळी २९ जिल्ह्यांतून एकूण १२३० जलतरणपटू सहभागी झाले होते. या स्पर्धेत ठाण्यातील स्टारफिशच्या जलतरणपटूंनी हॅट्ट्रिक साधून विजेता चषक पटकावला. याचबरोबर विविध गटांमध्ये १० जलतरणपटूंनी चमकदार कामगिरी करत ४ सुवर्ण, २ कांस्यपदकांची कमाई केली. ५ किमी सागरी जलतरण स्पर्धेत मयंक चाफेकर याने प्रथम क्र मांकासह सुवर्णपदक, तर जय एकबोटे यांनी तृतीय क्र मांकासह कांस्यपदक जिंकले. ३ किमी स्पर्धेत यश सोनक व सानिका तापकीर यांनी चतुर्थ क्र मांक पटकावला. २ किमी स्पर्धेत वेदान्त गोखले याला आठव्या क्र मांकावर समाधान मानावे लागले. १ किमी स्पर्धेत सवर अकुसकर हिने प्रथम क्र मांकासह सुवर्णपदकावर नाव कोरले. तर, नील वैद्य याने प्रथम क्र मांकासह सुवर्णपदकाची कमाई केली. ५०० मीटर स्पर्धेत आदित्य घाग याने प्रथम क्र मांकासह सुवर्णपदक तर परीन पाटील याने तृतीय क्र मांकासह कांस्यपदक पटकावले, तर आयुषी आखाडे ही पाचव्या क्र मांकावर राहिली. तसेच अथर्व पवार, अपूर्व पवार, वरद कोळी, मुक्ता काळे, सई डिंगणकर, मीर वीरा, अ‍ॅरिनी शहा, प्राश्मी गाला, रियान नरोटे, ईशा शिंदे, साची अहिरे, मिहिका सुर्वे, गौरी नाखवा, आर्यन डोके, सर्वेश डोके, अनीष चव्हाण, सोहम साळुंखे, सोहम सोनावणे, पृथ्वीराज कांबळे, अरीन नरोटे, सिद्धान्त पोळ, ऋ तुजा पोळ, ओम जोंधळे, हर्ष पाटील, मानव मोरे, गार्गी शिटकर, विजय ओजाळे, वैभव नाखवा, प्रशांत साळुंखे आदी ४० जलतरणपटूंना प्रशिक्षक कैलास आखाडे, नरेंद्र पवार तसेच ठामपा उपायुक्त संदीप माळवी, माहिती व जनसंपर्क अधिकारी महेश राजदेरकर, वसई-विरार महापालिका अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांचे मार्गदर्शन लाभले. 

टॅग्स :Sportsक्रीडाthaneठाणेState Governmentराज्य सरकार