शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

'बोगस' आदिवासींच्या जात वैधता प्रमाणपत्राच्या चौकशीसह कर्मचारी सेवेतील खंड वगळण्यासाठी ठाण्यात उपोषण

By सुरेश लोखंडे | Updated: July 9, 2024 15:55 IST

कोर्ट नका येथील या उपोषणात आफ्रोहच्या येथील ठाणे जिल्हा शाखेचे जिल्हाध्यक्ष नरेश खापरे,महिलाध्यक्षा रेखा पाटील,  इतर पदाधिकाऱ्यांनी आणि संबंधित त्रस्त कर्मचारी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

ठाणे : अनुसूचित जमातीच्या जागा रिक्त केलेल्या व सेवा संरक्षीत असलेल्या तसेच अधिसंख्य पदावर वर्ग केलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवेतील तांत्रिक खंड  वगळावे आणि अनुसूचित क्षेत्रातील नामसदृश्याचा फायदा घेणाऱ्या 'बोगस' आदिवासींच्या जात वैधता प्रमाणपत्राची विशेष चौकशी समितीमार्फत  चौकशी करावी, या व इतर  मागण्यांसाठी ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन (आफ्रोह) या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी येथील शासकीय विश्रामगृहासमोर आज एक दिवशीय लाक्षणिक उपोषण करून ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांना मागण्यांचे निवेदन दिले.

कोर्ट नका येथील या उपोषणात आफ्रोहच्या येथील ठाणे जिल्हा शाखेचे जिल्हाध्यक्ष नरेश खापरे,महिलाध्यक्षा रेखा पाटील,  इतर पदाधिकाऱ्यांनी आणि संबंधित त्रस्त कर्मचारी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यावेळी या लाक्षणिक उपोषणकर्त्यांच्या शिष्टमंडळाने ठाणे जिल्हाधिकार्यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. अनुसूचित जमातीचे अस्सल जातप्रमाणपत्र तपासणी समितीने  'अवैध' ठरविण्यात आल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे शासनाच्या.२१डिसेंबर २०१९ च्या शासन निर्णयाने त्यांना नियमबाह्य अधिसंख्य पदावर वर्ग केले. या अधिसंख्य पदावर वर्ग केलेल्या कर्मचा-यांना  सेवाविषयक व सेवानिवृत्तीविषयक लाभ देण्याचा निर्णय शासनाने १४ डिसेंबर २०२२ रोजी  घेतला.

तथापि या निर्णयात 'एक दिवसाचा तांत्रिक खंड' दिल्यामुळे अनेक विभाग वेतनवाढ व वेतनवाढीसह सेवानिवृत्तीविषयक लाभ देण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे शासनाच्या या कर्मचा-यांना सेवाविषयक लाभ देण्याच्या निर्णयात स्पष्टता येण्याकरता तांत्रिक खंड वगळण्याचा,आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्याचा  तसेच अधिसंख्य पदावर वर्ग कर्मचा-यांना १० सप्टेंबर २००१ च्या वित्त विभागाच्या शासन निर्णयानुसार सर्व सेवाविषयक लाभ मंजूर करण्यासाठी शुद्धीपत्रक  काढण्यात यावे.  शासन निर्णयातील मुद्दा क्र.४.२ नुसार अद्यापही  ज्या विभागातील सेवासमाप्त कर्मचा-यांना सेवेत घेतले नाहीत, त्याना त्वरीत अधिसंख्य पदाचे आदेश देवून सेवेत घेण्यात यावेत ही प्रमुख मागणी  यावेळी ऑफ्रोहने केली आहे.

अनुसूचित क्षेत्रातील, परप्रांतीय, धर्मांतरण केलेल्यांनी आदिवासींच्या नामसदृश्याचा फायदा घेणा-या बोगस आदिवासींची SIT मार्फत चौकशी करण्याची मागणीसुद्धा ऑफ्रोह ने केली आहे.

महाराष्ट्रात २०११ च्या जनगणनेनुसार  अनुसूचित जमातीची लोकसंख्या १०५१०२१३ म्हणजे लोकसंख्येच्या प्रमाणात ९.३५% एवढी आहे व हीच लोकसंख्या गृहीत धरून केंद्र सरकार कडून आदिवासींसाठी निधी येतो.त्यानुसार आदिवासींसाठी २५आमदार व ४ खासदारांचे मतदारक्षेत्र  निश्चित केले आहे. मात्र या लोकसंख्येत अनुसूचित क्षेत्रातील (TSP) लोकसंख्या केवळ ३९% एवढीच आहे.तर विस्तारीत क्षेत्रातील लोकसंख्या ६१% एवढी आहे. अनुसूचित क्षेत्रातील(TSP) संघटना व लोकप्रतिनिधी  ६१% विस्तारीत क्षेत्रातील(OTSP) लोकसंख्येला सतत 'बोगस' ठरवत आहेत. आमदार व खासदारांच्या  मतदारक्षेत्र रचनेसाठी तसेच केंद्र सरकारकडून निधी मिळविण्यासाठी   विस्तारीत क्षेत्रातील ६१% लोकसंख्या चालते. मात्र  लाभ देताना,त्यांना जातप्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र देताना मात्र  अडवणूक केल्या  जात असल्याचा आरोपही ऑफ्रोह ने केला आहे.