शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यापुढील प्रवास होणार जलद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 00:46 IST

पाचव्या-सहाव्या मार्गिकांचे काम जून २०१९ पर्यंत; पन्नासहून अधिक लोकलफेऱ्या वाढणार

ठाणे : मुंब्रा रेतीबंदर येथील उड्डाणपुलाचे आणि पाचव्या व सहाव्या रेल्वे मार्गिकांच्या कामासह उर्वरित इतर कामेही जून २०१९ पर्यंत होतील, असे एमआरव्हीसीच्या वरिष्ठ अधिकाºयांनी रविवारी केलेल्या पाहणी दौºयातून स्पष्ट केले. या कामांमुळे ठाण्यापुढच्या रेल्वेस्थानकांसाठी आणखी ५० लोकलच्या फेºया दाखल होणार असल्याचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे जून २०१९ नंतर ठाण्याच्या पुढील प्रवास हा जलद आणि सोयीचा होणार आहे.मुंब्रा रेतीबंदर येथे पाचव्या व सहाव्या मार्गिकांसाठी उड्डाणपुलाचे पिलर उभारण्याचे काम सुरू आहे. परंतु, दोन दिवसांपूर्वी ओहोटीच्या वेळी येथील जमीन पाण्यासोबत वाहून गेल्यामुळे पाइलिंग रिग मशीन खाडीत पडली आणि त्या कामालाही धोका निर्माण झाला. त्याची पाहणी रविवारी खासदार शिंदे यांच्यासह एमआरव्हीसीच्या वरिष्ठ अधिकाºयांनी केली. सुरक्षिततेची सर्व खबरदारी घेऊन पाइलिंगचे काम करावे, जेणेकरून भविष्यात प्रवाशांचा जीव धोक्यात येणार नाही. आवश्यक असेल तर खाडीकिनारी संरक्षक भिंत बांधावी, जेणेकरून खाडीचे पाणी आत शिरून जमिनीला धोका निर्माण होणार नाही, अशा सूचना खासदारांनी एमआरव्हीसीच्या अधिकाºयांना केल्या. खारेगाव येथील रेल्वेच्या बोगद्यापासून मुंब्रा स्थानकापर्यंत सुमारे सव्वा किलोमीटरचा उन्नत मार्ग उभारण्यात येत असून यात ६५ पिलर्स उभारण्याची कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. हा उन्नत मार्ग बांधण्याचा निर्णय रेल्वेने आयत्यावेळी घेतला. त्यातच मूळ योजनेनुसार जुन्या बोगद्यालगत नवा बोगदा करण्यात येणार होता; परंतु त्यामुळे जुन्या बोगद्याला धोका निर्माण होईल, असे निष्पन्न झाल्यामुळे बोगद्याऐवजी रेतीबंदरमार्गे उन्नत मार्ग उभारून सध्याच्या मुंब्रा स्थानकाच्या पश्चिमेला हा मार्ग जोडण्याचा निर्णय घेतला. रेतीबंदरची जागा या प्रकल्पाला मिळावी, यासाठी खासदारांनी केलेल्या पाठपुराव्यामुळेच ती जागा मिळाली. २०० मीटरमध्ये कांदळवनांचा भाग असून त्यासाठी वनविभागाची परवानगीही प्राप्त झाली आहे. उच्च न्यायालयाची मंजुरी मिळताच त्या भागातही कामाला सुरु वात होणार असल्याचे एमआरव्हीसीचे मुख्य प्रकल्प अधिकारी म्हस्के यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेroad transportरस्ते वाहतूक