शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

भाईंदर पालिकेकडून सुनावणीचा फार्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 23:59 IST

आरजी जागेवर बांधकाम; नगरसेवकांविरोधात तक्रार

मीरा रोड : मीरा रोडच्या शांतीपार्क, गोकुळ व्हिलेजमधील रहिवाशांच्या हक्काच्या आरजी भूखंडावर झालेले बेकायदा बांधकाम तोडण्याची नोटीस बजावल्यानंतर कारवाईस विरोध करणारे, पालिका निधी वापरल्याप्रकरणी सात नगरसेवकांचे पद रद्द करा, या रहिवाशांच्या मागणीवर अखेर आयुक्तांनी सुनावणी घेतली. पण, यातून काहीही निष्पन्न झाले नाही.महापालिका २००६ पासून केवळ नोटिसा बजावत आहे. २०१२ मध्ये येथील बांधकामे बेकायदा ठरवून तोडण्याचा आदेश तत्कालीन पालिका उपायुक्तांनी दिला होता. त्यानंतर २०१८ मध्ये तत्कालीन अतिरिक्त आयुक्त माधव कुसेकर यांनीही कारवाईचे आदेश दिले होते.त्या अनुषंगाने प्रभाग अधिकाऱ्यांनी बेकायदा बांधकामांना नोटीस बजावली असता भाजपच्या नगरसेवकांनी कारवाईस विरोध केला. सत्ताधारी भाजपने आरजीची जागाच जय श्री गोपाळ मंडळाला देण्याचा ठराव मंजूर केला. येथे कामे करण्यास स्थानिकांनी विरोध केला.अखेर, जिल्हाधिकाऱ्यांनी आरजी जागेत आमदार निधी वापरणे बेकायदा ठरवत ते रद्द करत चौकशी सुरू केली. गोकुळ शांती वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष संतोष बाणावलीकर यांनी तत्कालीन उपमहापौर चंद्रकांत वैती, नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील, सुरेश खंडेलवाल, प्रशांत दळवी, आनंद मांजरेकर, दीपिका अरोरा व हेमा बेलानी यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची तक्रार आयुक्तांकडे केली होती.महापालिकेने नोटीस बजावल्यानंतर त्या कारवाईला या नगरसेवकांनी विरोध केला. परिणामी, कारवाई झाली नाही. चारही नगरसेवकांनी या बेकायदा बांधकामास प्रत्यक्ष संरक्षण देतानाच महापालिकेचा निधी वापरून कामे करण्याचा प्रयत्न केल्याचे हे प्रकरण आहे. या प्रकरणातील नगरसेवकांचे पद रद्द होणार की शाबूत राहणार याकडे मीरा-भार्इंदरच्या नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.सुनावणीला सहा नगरसेवकांची उपस्थितीरहिवाशांच्या पाठपुराव्यानंतर गुरुवारी आयुक्त डॉ. विजय राठोड यांनी सुनावणी ठेवली होती. बेकायदा बांधकामांना नगरसेवकांनी संरक्षण दिल्याची तक्रार करत त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी बाणावलीकर यांनी केली. सातपैकी वैती, दळवी, पाटील, अरोरा, खंडेलवाल, मांजरेकर हे सहा नगरसेवक उपस्थित होते, तर बेलानी अनुपस्थित होत्या.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक