शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी वाटले जाणार ९० कोटींचे पीक कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 23:37 IST

हंगामासाठी कृषीयंत्रणा सज्ज, खते, बियाणे देण्याचे नियोजन

ठाणे : शेतकऱ्यांना यंदाचे खरीप पीक घेण्यासाठी जिल्ह्यातील बँकांकडून ९० कोटी रुपये खरीप पीककर्जवाटप केले जाणार आहे. यापैकी आतापर्यंत २३ कोटी रुपये कर्जवाटप झाल्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी घेतलेल्या खरीप हंगाम आढावा बैठकीत कृषी विभागाने स्पष्ट केले. यावेळी कृषीरथास पालकमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवला. हा रथ ८ जूनपर्यंत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये फिरून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे.

येथील जिल्हा नियोजन सभागृहात ही खरीप हंगाम आढावा बैठक पार पडली. यावेळी पालकमंत्र्यांसह जिल्हा परिषद अध्यक्षा मंजूषा जाधव, खासदार कपिल पाटील, आमदार किसन कथोरे, गणपत गायकवाड, पांडुरंग बरोरा आदी आमदारांसह पालक सचिव गवई, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे आदींना कृषी अधीक्षक अंकुश माने यांनी यंदाच्या कृषी हंगाम योजनांचे पे्रझेंटेशन केले. शेतकºयांना पीककर्जवाटपासाठी ९० कोटी रुपयांचे नियोजन टीडीसीसी बँकेसह सहकारी बँका, खाजगी आणि राष्ट्रीयीकृत बँकांनी केल्याचे नमूद करण्यात आले.यंदा ६५ हजार हेक्टर शेतजमिनीवर खरीप हंगाम घेतला जाणार आहे. त्यापैकी ५९ हजार हेक्टरवर भातपिकाची लागवड होईल. उर्वरित वरी, नागली, कडधान्यांची लागवड होईल. यासाठी १० हजार क्विंटल बियाण्यांचे नियोजन केले आहे.

त्यापैकी पाच हजार ९०० क्विंटल सुधारित व संकरित बियाण्यांचा पुरवठा झाला आहे. तर, १४ हजार मेट्रिक टन खताचे यंदा नियोजन केले आहे. यावेळी बियाण्यांचे १५६ सॅम्पल काढण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना बियाण्यांचे वाटप होताच त्यांचे सॅम्पल घेण्यासाठी ठिकठिकाणी यंत्रणा सतर्क केली आहे. १२६ शेतीशाळांचे नियोजन केले आहे. भातलावणीपासून ते काढणीपर्यंत शेतकऱ्यांचे वर्ग या शेतीशाळेत चालणार आहे. यासाठी जिल्ह्यात १०८ कृषी सहायक तैनात आहेत.

सर्वाधिक वित्तपुरवठा जिल्हा बँकेकडूनयंदा वाटप करण्यात येणाºया ९० कोटींपैकी २० कोटींचा वित्तपुरवठा आधीच झालेला असून आता २३ कोटींपर्यंत शेतकºयांना तो होऊ घातला आहे. आतापर्यंत १४ टक्के वित्तपुरवठा पीककर्जापोटी शेतकºयांना झाल्याचे नमूद करण्यात आले. यामध्ये सर्वाधिक वित्तपुरवठा ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके द्वारे होत असून ६० हजार प्रतिहेक्टर पीककर्ज शेतकºयांना दिले जात असल्याचे माने यांनी निदर्शनास आणून दिले.

टॅग्स :Farmerशेतकरी