शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
3
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
4
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
5
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
6
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
7
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
8
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
9
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
10
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
11
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
12
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
13
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
14
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
15
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
16
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
17
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
18
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
19
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट

शेतकरी आंदोलनाला सात महिने पूर्ण; सरकारच्या निषेधार्थ संघर्ष समितीकडून जिल्ह्याधिकाऱ्यांना साकडे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2021 18:06 IST

Thane : मोदी सरकारमधील मंत्री मीनाक्षी लेखी यांनी आंदोलक शेतकऱ्यांबद्दल हेटाळणी पूर्वक मवाली अशा शब्दाचा प्रयोग केला आहे, त्यांचा निषेध करीत शेतकऱ्यांच्या मानहानी बाबत त्यांच्यावर खटला दाखल करावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

ठाणे : दिल्ली सीमेवरील 'शेतकरी आंदोलनाला' २६ जुलैला सात महिने पूर्ण झाल्याची आठवण करून देत केंद्रातील व राज्यातील कॉर्पोरेट धार्जिणे सरकार आहे, शेतकरी विरोधी तीन कृषी विषयक कायदे, राज्यांच्या अधिकारावर गदा आणून, अनाधिकाराने, कायदे मंडळातही मुस्कटदाबी करून भांडवलदारांचे पक्षपाती कायदे मंजूर केल्याचा आरोप करीत त्यांच्या निषेधार्थ येथील जन आंदोलन संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ठाणे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील यांची भेट घेतली आणि त्यांना ठाणे जिल्हाधिकाऱ्यांद्वारे पंतप्रधान ‌व मुख्यमंत्र्यांना निवेदन देत ‌निषेध व्यक्त केला आहे.

येथील जिल्हाधिकारी मार्फत पंतप्रधान आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले. शिष्टमंडळात जन आंदोलनांची संघर्ष समितीचे निमंत्रक  विश्वास उटगी, एम. ए. पाटील, जगदीश खैरालिया आणि सुब्रतो भट्टाचार्य आदींचा या शिष्टमंडळात सहभाग होता. दिल्लीच्या सीमेवर गेली सात महिने संयुक्त किसान संघर्ष समितीमार्फत दीर्घ काळ आंदोलन सुरू आहे. या आंदोलनावर सरकारने दमन यंत्रणेमार्फत अनेक अन्याय अत्याचार केल्याचा आरोपासह  पाचशेच्यावर शेतकऱ्यांनी आहुती देऊन, हे आंदोलन अथकपणे सुरू ठेवले आहे, असे स्मरण या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे करून दिले आहे.

शेतकऱ्यांचे हे आंदोलन जागतिक कीर्तीचे व ऐतिहासिक असेच आहे. तीन कृषी विषयक कायदे मागे घेतल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही, असा या आंदोलनकर्त्यांनी निर्धार व्यक्त करीत मोदी सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी असमर्थ ठरल्यामुळे त्यांनी तात्काळ राजीनामा देण्याची मागणी त्यांनी केली आहे. मोदी सरकारमधील मंत्री मीनाक्षी लेखी यांनी आंदोलक शेतकऱ्यांबद्दल हेटाळणी पूर्वक मवाली अशा शब्दाचा प्रयोग केला आहे, त्यांचा निषेध करीत शेतकऱ्यांच्या मानहानी बाबत त्यांच्यावर खटला दाखल करावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

टॅग्स :thaneठाणेFarmers Protestशेतकरी आंदोलन