शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

मलंगगड परिसरातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 23:21 IST

दीपक केसरकर यांचे आश्वासन; नुकसान झालेल्या भातशेतीची पाहणी

अंबरनाथ : मलंगगड परिसरातील भातशेतीचे अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. येथील शेतकऱ्यांनाही नुकसानभरपाई मिळेल, असे आश्वासन माजी गृहराज्यमंत्री आणि आमदार दीपक केसरकर यांनी दिले आहे. केसरकर यांनी मंगळवारी मलंगगड परिसरात शेतीची पाहणी करून शेतकºयांच्या अडचणी जाणून घेतल्या.अंबरनाथ तालुक्यात यंदा अवकाळी पावसाने एकूण ९३ गावांतील २७९९.६२ हेक्टर क्षेत्रावरील भातशेतीचे नुकसान झाले आहे. यामध्ये सहा हजार ९१७ शेतकरी बाधित झाले आहेत. त्यातही मलंगगड आणि नेवाळी परिसरातील बहुतांशी जमीन ही संरक्षण विभागाच्या नावावर आहे. याच जमिनी ताब्यात घेण्यावरून दोन वर्षांपूर्वी नेवाळी आंदोलनही पेटले होते. या जमिनी अनेक वर्षांपासून मूळ मालक असलेले शेतकरी कसत आहेत. यंदा अवकाळी पावसाने या शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. जमीन नावावर नसल्याने भरपाई मिळणार कशी? असा प्रश्न शेतकºयांना पडला होता. त्यावर शासकीय जमिनी कसत असलेल्या शेतकºयांना नुकसानभरपाई देण्याबाबतची चर्चा झाली असून मलंगगड परिसरातील शेतकºयांनाही यामध्ये गृहीत धरले जाईल, असे आश्वासन यावेळी केसरकर यांनी दिले. यावेळी माजी आमदार विनोद घोसाळकर, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, तालुकाप्रमुख अशोक म्हात्रे, उपतालुकाप्रमुख रामचंद्र मढवी, चैनू जाधव, संदीप पाटील आदी शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.शिवसेना संपवण्याची खेळी अयशस्वी!यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेला संपवण्याची भाजपची खेळी होती. माझ्या स्वत:च्या मतदारसंघात गोव्याचे भाजपचे मंत्री प्रचार करत होते, तसेच राज्यात अनेक ठिकाणी भाजपने अपक्ष उमेदवार उभे केले होते. त्यामुळे अपक्षांच्या जीवावर सरकार स्थापन करत शिवसेनेला संपवण्याची भाजपची खेळी होती. ती अयशस्वी ठरल्याचे केसरकर म्हणाले. यावेळी त्यांनी नारायण राणे यांच्यावरही निशाणा साधला. राणे यांना पक्षात घेणेदेखील शिवसेना संपवण्यासाठीची भाजपची खेळी होती. मात्र, राणे जिथे जातात त्यांचे सरकार जाते. शिवसेनेने राणे यांना मुख्यमंत्री केले तेव्हा शिवसेनेची सत्ता गेली, राणे काँग्रेसमध्ये गेले अन् काँग्रेसची सत्ता गेली. आता भाजपचेही तेच झाल्याचे केसरकर म्हणाले.