शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वाड्यातील शेतकऱ्यांनी मांडली आमदारांकडे कैफियत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 01:26 IST

बाधित शेतकऱ्यांना विश्वासात न घेता वाहिनीचे काम सुरू केल्याने शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तक्रारी केल्या, परंतु त्याची दखल न घेतल्याचा आराेप शेतकऱ्यांनी केला आहे.

वाडा : तालुक्यातील डाकिवली परिसरातून उच्चदाबाची वीजवाहिनी जात असून, या वाहिनीसाठी मनोरे उभारणीचे काम महापारेषणने हाती घेतले आहे. या वाहिनीमुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान होणार असून, ते देशोधडीला लागणार आहेत. बाधित शेतकऱ्यांना विश्वासात न घेता वाहिनीचे काम सुरू केल्याने शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तक्रारी केल्या, परंतु त्याची दखल न घेतल्याचा आराेप शेतकऱ्यांनी केला आहे. याबाबत आमदार सुनील भुसारा यांच्याकडे शेतकऱ्यांनी कैफियत मांडली. या अनुषंगाने भुसारा यांनी शनिवारी गावात येऊन शेतकरी आणि महापारेषणचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी महापारेषणच्या अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला.२२० केव्ही तारापूर-बोरिवली आणि बोईसर-घोडबंदर-लीलो कुडूस अशी उच्चदाबाची विद्युतवाहिनी जात आहे. वाडा, वसई व पालघर या तालुक्यांतील गावे यामध्ये बाधित होणार आहेत. त्यासाठी ३० मीटर जागा संपादित करण्यात आली आहे. हे करताना शेतकऱ्यांना विश्वासात न घेता वाहिनीसाठी मनोरे उभारण्याचे काम हाती घेतले आहे. त्यातच २०१६ मध्ये बनवलेल्या नकाशाप्रमाणे हे काम न करता महापारेषणने मनमानी कारभार करत आपल्या मर्जीप्रमाणे काम सुरू केले. यात डाकिवली गावातील अनेक शेतकरी बाधित झाले आहेत. येथील बहुतांशी शेतकरी अल्पभूधारक शेतकरी असून त्यांच्या शेतातून वाहिनी जात असल्यामुळे त्यांचे लागवड क्षेत्र संपुष्टात येणार असल्याचे शेतकऱ्यांनी आमदारांना सांगितले. भुसारा यांच्यासमवेत राष्ट्रवादी काॅंग्रेस ओबीसी सेलचे पालघर जिल्हाध्यक्ष तथा पालघर जिल्हा परिषदेचे गटनेते नरेश आकरे, तालुकाध्यक्ष रोहिदास पाटील, युवा नेते सुरेश पवार, निखिल पष्टे, कुमार सावंत, नायब तहसीलदार सुनील लहांगे, महापारेषणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता भारत चौगुले आदी उपस्थित हाेते.उच्चस्तरीय बैठकीत ताेडगा काढण्याचे आश्वासनलाेहाेपे गावापासून पुढे वनविभागाच्या जागेतून ही वाहिनी नेल्यास किंवा डाकिवली गावाला वळसा घालून नदीकाठावरून नेल्यास लागवड क्षेत्र बाधित हाेणार नाही, हेही शेतकऱ्यांनी आ. भुसारा यांच्या लक्षात आणून दिले. मंत्रालयात यासंदर्भात उच्चस्तरीय बैठक बोलावून यावर मार्ग काढून शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल, असे आश्वासन आ. भुसारा यांनी शेतकऱ्यांना दिले.