शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

बळिराजा देतोय अवकाळीला तोंड, एसआरटीसाठी पुढाकार घेऊ : मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2023 10:28 IST

नेरळ येथील सगुणा बाग येथे एसआरटी शेतकरी कृषी सन्मान सोहळा व परिसंवादात सोमवारी ते बोलत होते.  

लोकमत न्यूज नेटवर्कनेरळ : सध्या अवकाळी तसेच पिकांवरील रोग अशा दुष्टचक्राला बळिराजा तोंड देत पुढे जातोय. हे दुष्टचक्र थांबण्यासाठी शाश्वत तंत्रज्ञानाची गरज असून, एसआरटी म्हणजेच सगुणा रिजनरेटिव्ह टेक्निक हे अत्याधुनिक शेतीचे तंत्रज्ञान आहे. याद्वारे शेतकऱ्यांना फायदा होतोय, ही निश्चितच बदलाची नांदी आहे. हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी आत्मसात करावे यासाठी राज्य शासन नक्कीच पुढाकार घेईल असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

नेरळ येथील सगुणा बाग येथे एसआरटी शेतकरी कृषी सन्मान सोहळा व परिसंवादात सोमवारी ते बोलत होते.  यावेळी मंचावर रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, खा. श्रीरंग (आप्पा) बारणे, देवगिरी कल्याण आश्रम बारीपाडा, धुळेचे प्रांत अध्यक्षा चैतराम पवार, आ.महेंद्र थोरवे,आ. भरत गोगावले, कृषिरत्न शेतकरी सगुणा बाग चंद्रशेखर (दादा) भडसावळे,  जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पोकरा प्रकल्पाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ विजय कोळेकर, एसआरटी शेतकरी परशुराम आगिवले, अनिल निवळकर, चित्रकार राकेश देवरुखकर यांचा सन्मान करण्यात आला.

५२ शेतकऱ्यांचा सन्मानयावेळी ५२ शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. अनिल निवळकर यांची संकल्पना आणि राकेश देवरुखकर यांनी काढलेल्या भूमातेच्या चित्राचे  मुख्यमंत्री व विशेष पाहुण्यांच्या हस्ते  अनावरण करण्यात आले. तसेच सगुणा फाउंडेशन डॉट एनजीओ या संकेतस्थळाचे प्रतीकात्मक उदघाटन करण्यात आले. 

शासकीय पाठबळ मिळाल्यास बदल घडेलयावेळी कृषिभूषण शेतकरी चंद्रशेखर भडसावळे यांनी एसआरटीचे महत्त्व विशद केले. मला राजकारणातील जास्त कळात नाही, पण काही महिन्यांपूर्वी क्रांतिकारी निर्णय घेऊन  बदल घडवून आणला.  एसआरटीला शासकीय पाठबळ मिळाल्यास शेतीमध्ये आमूलाग्र बदल घडेल असेही ते म्हणाले. 

आज रासायनिक शेती फोफावली आहे. अवकाळीवर मात करण्यासाठी शाश्वत शेतीचे तंत्रज्ञान गरजेचे आहे. भडसावळे यांनी हे तंत्र विकसित केले याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. शेती हा कृषी यज्ञ आहे, तो अखंड धगधगता ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री