शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी स्वत:हून ‘समृद्धी’साठी तयार, राज यांचा दावा फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 02:46 IST

डोंबिवली : समृद्धी महामार्गाबाबत सरकार सकारात्मक असल्याने शेतकरी स्वत:ची जमीन देण्यासाठी स्वत:हून पुढे येत असल्याचा दावा सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.

डोंबिवली : समृद्धी महामार्गाबाबत सरकार सकारात्मक असल्याने शेतकरी स्वत:ची जमीन देण्यासाठी स्वत:हून पुढे येत असल्याचा दावा सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी समृध्दी महामार्गाच्या कामात सरकार स्थानिकांना विश्वासात घेत नसून या महामार्गाच्या आडून वेगळया विदर्भाची चूल मांडली जात असल्याचा आरोप केला होता. डोंबिवलीत एका खाजगी रूग्णालयाच्या कार्यक्रमाला रविवारी पालकमंत्री शिंदे यांनी हजेरी लावली होती. तेव्हा त्यांना या आरोपांबाबत विचारता त्यांनी स्थानिकांना विश्वासात घेऊनच महामार्गाचे काम केले जात असल्याचे सांगितले. त्यांचे समाधान झाल्याशिवाय महामार्गाचे काम सुरू होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. जनतेच्या हिताचे निर्णय झाले पाहिजेत, त्यांना योग्य मोबदला मिळाला हवा, त्यांच्यावर अन्याय होता कामा नये अशी भूमिका दस्तुरखुद्द शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची आहे. त्या भूमिकेची पुरेपूर अंमलबजावणी केली जाईल. कोणावर अन्याय होणार नाही, असेच मुख्यमंत्र्याचेही धोरण असून स्थानिकांचे समाधान झाल्याशिवाय पुढे कुठलाही निर्णय घेतला जाणार नाही, असे शिंदे यांनी सांगितले.>केडीएमसीला खडे बोलखाजगी रूग्णालयांप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांनीही आरोग्य सेवा सुधारणे आवश्यक असल्याचे खडे बोल पालकमंत्री शिंदे यांनी महापौर राजेंद्र देवळेकर यांच्या उपस्थितीत अप्रत्यक्षपणे केडीएमसीला सुनावले. जर काम होत नसेल तर राज्य सरकार निश्चितच त्यांचा विचार करेल, असा इशारा त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. ठाण्यात युध्दपातळीवर आरोग्य सेवा सुधारण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांना चांगली आरोग्य सुविधा देणे हे महापालिकेचे कर्तव्य असल्याचे त्यांनी खाजगी रूग्णालयाच्या कार्यक्रमात सांगितले. ठाण्याचे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल ज्या धडाडीने काम करतात, तशाच कामाची अपेक्षा केडीएमसीचे आयुक्त पी. वेलरासू यांच्याकडून आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने एकत्र येऊन काम केले पाहिजे. शहराचा विकास हाच केंद्रबिंदू मानून काम झाले पाहिजे, असे त्यांनी सुचवले.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाdombivaliडोंबिवली