शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेचे आमदार निलेश राणेंची BJP प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांवर आगपाखड, संतापून म्हणाले...
2
Sushma Andhare : "प्रिय उदयभाऊ, उपमुख्यमंत्री पदाची तुमची सुप्त महत्वकांक्षा मी..."; सुषमा अंधारेंचा खोचक टोला
3
शेअर मार्केट, रियल इस्टेट क्रॅश येणार? रॉबर्ट कियोसाकींचा मोठा इशारा; 'या' क्षेत्रात गुंतवणुकीचा सल्ला
4
"अजित पवार उपमुख्यमंत्री; मुख्यमंत्री फडणवीस, त्यामुळे त्यांनाच मतदान करा", चंद्रकांत पाटलांचं विधान
5
पंकजा मुंडे यांच्या पीएच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू; कुटुंबीयांकडून हत्येचा गंभीर आरोप, वरळी पोलीस ठाण्यात आक्रोश
6
शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे सोन्याला पुन्हा भाव! मात्र, चांदी घसरली; आजचे दर काय?
7
Delhi Blast : दहशतवादी डॉक्टरांमध्ये मतभेद; आदिलच्या लग्नाला का गेला नाही उमर? दिल्ली स्फोटात मोठा खुलासा
8
IND vs SA : कोण आहे Senuran Muthusamy? कसोटी पदार्पणात 'विराट' विकेट; भारताशी खास कनेक्शन अन् बरंच काही
9
४०व्या वर्षी दुसऱ्या बाळाला जन्म देणार सोनम कपूर, हटके मॅटर्निटी फोटोशूटने वेधलं लक्ष
10
युद्धाचा भडका उडणार, अमेरिका 'या' देशात सत्तांतर घडवण्याच्या तयारीत?; विमाने रद्द, युद्धनौका, लढाऊ विमाने तैनात
11
कर्मचारीहिताचा मोठा निर्णय! 'गिग वर्कर्स'नाही मिळणार PF-ग्रॅच्युइटी; नवीन लेबर कोडचे ३ महत्त्वाचे फायदे!
12
टॉर्चर अन् चॅटिंगने १० महिन्यातच संपवला संसार; पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीच्या मृत्यू प्रकरणात गूढ वाढले
13
काळाचा घाला! नैनीतालमध्ये भीषण अपघात, खोल दरीत पडली कार; तिघांचा मृत्यू, १ जखमी
14
"लढाई करून जिंकण्याचा दम नाही म्हणूनच..."; दिल्ली स्फोटावरून लष्करप्रमुख द्विवेदींनी पाकिस्तानचे काढले वाभाडे
15
टीम इंडियावर वनडेत नवा कर्णधार शोधण्याची वेळ! कोण घेणार शुभमन गिलची जागा?
16
जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकांवर टांगती तलवार; सुप्रीम कोर्टात काय होईल? इच्छुकांची घालमेल
17
VIDEO: हरलेल्या संघाच्या कॅप्टनला विचारलं- "जिंकल्यावर कसं वाटतंय?"; चूक लक्षात येताच....
18
"तू आई-वडिलांना छोट्या गोष्टी..."; फिजिओथेरपिस्टचा होणाऱ्या नवऱ्याला मेसेज, का संपवलं आयुष्य?
19
५ डॉक्टरांनी २६ लाख जमवले; दिल्लीतील स्फोट फक्त ट्रेलर, अनेक शहरांत हल्ल्याची योजना, NIA चा खुलासा
20
आमदार आल्यानंतर उभे न राहिल्याने डॉक्टरवर कारवाई; हायकोर्टानं काढली सरकारची खरडपट्टी, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

आधारवाडी ते जेल रस्त्याचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 03:51 IST

केडीएमसीने आधारवाडी ते कारागृहादरम्यानच्या रस्त्याच्या विकासाचे काम हाती घेतले होते. मात्र, त्यात बाधित होणाऱ्या उमा भावे यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे न्यायालयाने कामाला स्थगिती दिली होती.

कल्याण : केडीएमसीने आधारवाडी ते कारागृहादरम्यानच्या रस्त्याच्या विकासाचे काम हाती घेतले होते. मात्र, त्यात बाधित होणाऱ्या उमा भावे यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे न्यायालयाने कामाला स्थगिती दिली होती. परंतु, ती स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने उठवली आहे. त्यामुळे २१ वर्षानंतर रस्त्याच्या विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे, अशी माहिती केडीएमसीच्या विधी विभागाने दिली.आधारवाडी ते कारागृह या रस्त्याच्या विकासाला महापालिकेने मंजुरी दिली होती. हा रस्ता १८ मीटर रुंद करण्याचे प्रस्तावित होते. मात्र, या रस्त्याच्या लगत राहणाºया भावे यांनी १९९७ मध्ये कल्याण न्यायालयात दावा दाखल केला होता. त्याविरोधात महापालिका प्रशासन अपिलात गेले होते. न्यायालयात महापालिकेच्या बाजूने निकाल लागला. त्याविरोधात भावे यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली. तेथे न्यायालयाने महापालिकेच्या बाजूने निकाल दिला. या निकालाविरोधात भावे यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने दीड वर्षापूर्वी रस्त्याच्या विकासकामाला स्थगिती दिली होती. दीड वर्षानंतर ही स्थगिती उठवली असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने महापालिकेच्या विधी विभागासई-मेलद्वारे कळवले आहे. त्यामुळे रस्त्याच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. २१ वर्षांपासून भावे यांनी महापालिकेविरोधात न्यायालयीन लढा दिला. मात्र, महापालिकेच्या बाजूने निकाल लागल्याने या रस्त्याचा विकास होणार आहे.दरम्यान, हा लढा देत असताना भावे यांचे दरम्यानच्या काळात निधन झाले. आता ही याचिका त्यांचा मुलगा अनंत भावे चालवत होता, अशी माहिती विधी विभागाने दिली.>भावे यांच्या घरावर बुलडोझरसर्वोच्च न्यायालयाने स्थगिती आदेश उठवताच महापालिकेचे कारवाई पथक मंगळवारी तेथे पोहचले. भावे यांचे घर बुलडोझरद्वारे पाडण्यास सुरुवात केली. भावे कुटुंबियांनी सांगितले की, न्यायालयात आमच्या बाजूने निकाल लागला नाही. पण महापालिकेने किमान एक दिवसाची मुभा द्यायला हवी होती. महापालिकेने शौचालयही तोडले. त्यामुळे घरातील चार महिला कुठे जातील. पर्यायी घर कुठे मिळणार? महापालिकेने जराही माणुसकी दाखवली नाही.