शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांचे बस्तान, अवमान याचिका कागदावरच?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 00:56 IST

न्यायालयाच्या मनाई आदेशानंतरही पूर्वेला रेल्वेस्थानक परिसरात फेरीवाल्यांचे बस्तान कायम आहे. स्थानक परिसरात १५० मीटरवर पांढरे पट्टे मारण्याची मागणी लावून धरणा-या फेरीवाल्यांनीच राथ रोड पुन्हा बळकावला आहे

डोंबिवली : न्यायालयाच्या मनाई आदेशानंतरही पूर्वेला रेल्वेस्थानक परिसरात फेरीवाल्यांचे बस्तान कायम आहे. स्थानक परिसरात १५० मीटरवर पांढरे पट्टे मारण्याची मागणी लावून धरणा-या फेरीवाल्यांनीच राथ रोड पुन्हा बळकावला आहे. दरम्यान, फेरीवाले न हटल्यास केडीएमसीविरोधात अवमान याचिका दाखल करण्याचा इशारा मनसेने दिला होता. परंतु, याप्रश्नी त्यांची अवमान याचिकाही कागदावरच असल्याचे स्पष्ट झाले आहे.अतिक्रमण विभागाला न जुमानता फेरीवाले पूर्वेतील पाटकर रोड, नेहरू रोड, राथ रोड, स्वामी विवेकानंद रोड, उर्सेकर वाडीत पथारी पसरतात. फेरीवालाविरोधी पथक दाखल झाल्यानंतर त्यांची पांगापांग होते. त्यानंतर ते पुन्हा आपल्या जागी ठाण मांडतात. फेरीवल्यांमुळे राथ रोड, नेहरू रोडवर वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे फेरीवाल्यांवर केडीएमसीच्या अधिकाºयांचे वचक नसल्याचे पाहायला मिळते.मुंबईतील एलफिन्स्टन्स येथील पादचारी पुलावरील घडलेल्या दुर्घटनेनंतर मनसेने फेरीवाल्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. मात्र, मनसे आता बॅकफूटवर आली आहे का?, केडीएमसी अथवा फेरीवाल्यांविरोधात त्यांनी अवमान याचिका का दाखल केलेली नाही, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.या संदर्भात मनसेचे उपाध्यक्ष राजेश कदम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनाही नागरिकांनी फेरीवाल्यांचे फोटो पाठवल्याचे स्पष्ट केले. केडीएमसीला बोलून आम्हीही कंटाळलो. पोलीस संरक्षण मिळत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. मनसैनिक रस्त्यावर उतरल्यास एक लाखाचे बॉण्ड घेतले जातात, पण पोलिसांनी न्यायालयाचा अवमान करणाºया किती फेरीवाल्यांवर गुन्हे दाखल केले, असा सवालही त्यांनी केला.

टॅग्स :hawkersफेरीवाले