शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

कारवाई टाळण्यासाठी फुकटचे भाडेकरू, साक्षीदाराने नोंदवला न्यायालयात जबाब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 02:01 IST

अवैध आणि निकृष्ट दर्जाच्या बांधकामांमुळे महापालिकेने इमारत पाडण्याची कारवाई करू नये, यासाठी आरोपी विकासकांनी इमारतीमध्ये फुकटचे भाडेकरू ठेवले होते, असा जबाब लकी कम्पाउंड इमारत दुर्घटनेमध्ये एका साक्षीदाराने गुरुवारी न्यायालयासमोर नोंदवला.

ठाणे : अवैध आणि निकृष्ट दर्जाच्या बांधकामांमुळे महापालिकेने इमारत पाडण्याची कारवाई करू नये, यासाठी आरोपी विकासकांनी इमारतीमध्ये फुकटचे भाडेकरू ठेवले होते, असा जबाब लकी कम्पाउंड इमारत दुर्घटनेमध्ये एका साक्षीदाराने गुरुवारी न्यायालयासमोर नोंदवला.शीळ-डायघर येथील लकी कम्पाउंडमध्ये बेकायदा उभारण्यात आलेली सात मजली इमारत ४ एप्रिल २०१३ रोजी कोसळली होती. ७४ जणांचा बळी घेणाºया या दुर्घटनेप्रकरणी विकासक, पालिका अधिकारी, नगरसेवक, पोलीस, पत्रकारांसह २७ आरोपींना अटक केली होती. जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. बांबर्डे यांच्या न्यायालयात गुरुवारी या प्रकरणी सुनावणी झाली. लकी कम्पाउंडमधील एका चाळीमध्ये राहणाºया राजकुमार फतेहबहादूर सिंग यांचा जबाब गुरुवारी विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी न्यायालयात नोंदवला. साक्षीदाराचे नातलग अजय सिंग एका अन्य चाळीत राहत होते. शौचालयाची सुविधा नसल्याने ते पर्यायी निवाºयाच्या शोधात होते. आरोपी विकासकांनी अजय सिंग यांना निर्माणाधीन इमारतीमधील खोली मोफत दिली. अजय सिंग हे पत्नी, चार मुलींसोबत येथे राहत असताना ४ एप्रिल २०१३ रोजी इमारत कोसळली. यात सिंग, त्यांची पत्नी, दोन चिमुकल्यांचा मुलींचा मृत्यू झाला. राजकुमार फतेहबहादूर सिंग यांनी ही माहिती न्यायालया दिली. तसेच दोन आरोपींची न्यायालयासमोर ओळख पटवली. दरम्यान या प्रकरणी शुक्रवारी राजकुमार यांची उलटतपासणी बचाव पक्षाच्या वतीने घेतली जाणार आहे.

टॅग्स :Courtन्यायालय