शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

अपक्षांच्या मतांच्या टक्केवारीत भिवंडीत चढउतार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 01:38 IST

लोकसभा निवडणुकीसाठी भिवंडी मतदारसंघातून यंदा १५ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात राजकीय पक्षांचे आठ उमेदवार आहेत, तर सात अपक्ष उमेदवार आहेत

भिवंडी : लोकसभा निवडणुकीसाठी भिवंडी मतदारसंघातून यंदा १५ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात राजकीय पक्षांचे आठ उमेदवार आहेत, तर सात अपक्ष उमेदवार आहेत. मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर अस्तित्वात आलेल्या भिवंडीत २००९ मध्ये एकूण १६ उमेदवारांपैकी सहा अपक्ष उमेदवार रिंगणात होते. तर, २०१४ च्या निवडणुकीत १३ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी तीन अपक्ष उमेदवार होते.नेहमी निवडणुकीत नाराजीतून अथवा बंडखोरीतून अपक्ष म्हणून उमेदवार पुढे येताना दिसतात. मात्र, भिवंडीत तसे दिसून येत नाही. २००९ च्या निवडणुकीत अपक्षांना विजयी उमेदवाराच्या मार्जिनपेक्षा जास्त मते मिळाली. मात्र, २०१४ च्या निवडणुकीत अपक्ष उमेदवारांना सुमार मते मिळाली.२००९ च्या निवडणुकीत काँग्रेसचे सुरेश टावरे व भाजपचे जगन्नाथ पाटील यांच्यात मुख्य लढत झाली. त्यामध्ये भाजपचे जगन्नाथ पाटील यांना एक लाख ४१ हजार ४२५ मते मिळाली, तर काँग्रेसचे सुरेश टावरे यांना एक लाख ८२ हजार ७८९ मते मिळाली. ४१ हजार ३६४ मताधिक्याने टावरे विजयी झाले. त्यावेळी अपक्षांना मिळून एकूण ९५ हजार ४८५ मते मिळाली होती. मात्र, या अपक्षांमधील उमेदवार विश्वनाथ पाटील यांनी ७७ हजार ७६९ अशी विजयी उमेदवाराच्या मार्जिनपेक्षाही जास्तीची मते घेतली, तर समाजवादीचे उमेदवार आर.आर. पाटील यांनी ३२ हजार ७६७ मते मिळवून या मार्जिनच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही पहिली निवडणूक असल्याने त्याचा अंदाज घेऊन २०१४ च्या दुसऱ्या निवडणुकीत उमेदवारांचा सहभाग होता.२०१४ च्या दुसºया निवडणुकीत एकूण १३ उमेदवार निवडणुकीत उभे होते. त्यावेळी तीन उमेदवार अपक्ष होते. त्यावेळी भाजपचे कपिल पाटील आणि काँग्रेसचे विश्वनाथ पाटील यांच्यात लढत झाली. कपिल पाटील यांना चार लाख ११ हजार ७० मते मिळाली. तर, विश्वनाथ पाटील यांना तीन लाख एक हजार ६२० मते मिळाली आहेत. कपिल पाटील हे एक लाख नऊ हजार ४५० च्या मताधिक्याने निवडून आले. तर, अपक्षांना नऊ हजार ९९९ मते मिळाली होती. ती विजयी उमेदवाराच्या मार्जिनच्या कोसो दूर होती. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019bhiwandi-pcभिवंडी