शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

घरकाम करणा-या मुलीला दिले चटके, आरोप खोटे : तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 03:35 IST

कल्याण : ‘मोहन प्राइड’ या हायप्रोफाइल सोसायटीत राहण्या-या अनिल व सीमा तलवार दाम्पत्याने त्यांच्याकडे घरकाम करणा-या १५ वर्षांच्या मुलीला अमानुष मारहाण करून चटके देऊन तिचा छळ केल्याचे प्रकरण उघड झाले आहे.

कल्याण : ‘मोहन प्राइड’ या हायप्रोफाइल सोसायटीत राहण्या-या अनिल व सीमा तलवार दाम्पत्याने त्यांच्याकडे घरकाम करणा-या १५ वर्षांच्या मुलीला अमानुष मारहाण करून चटके देऊन तिचा छळ केल्याचे प्रकरण उघड झाले आहे. मुलीने कशीबशी त्यांच्या तावडीतून सुटका करून पळ काढल्यानेत्याला वाचा फुटली. खडकपाडा पोलीस ठाण्यात तलवार दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.घरकामासाठी त्यांनी या अल्पवयीन मुलीला दिल्लीहून आणले होते. मारहाणीमुळे तिच्या अंगावर वळ उठले आहेत. तिला चटकेही देण्यात आले. त्याला कंटाळून ती तलवार यांच्या तावडीतून बाहेर पडली. त्यानंतर, तिने सामाजिक कार्यकर्ते मनोज ठाकूर यांच्या मदतीने पोलीस नियंत्रण कक्ष गाठला. त्यांनी तिला खडकपाडा पोलीस ठाण्यात पाठवले. तेथे तिने घडला प्रकार सांगितला. सुरुवातीला पोलिसांनी तिच्या तक्रारीची गंभीर दखल घेतली नव्हती. ही मुलगी मूळची झारखंड येथील आहे. प्लेसमेंट चालक अजयकुमार याने तिला दिल्ली येथे कामाला लावण्याचे प्रलोभन दाखवत कल्याणला तलवार यांच्या घरी घरकामासाठी आणले असल्याची प्राथमिक माहिती उघड झाली आहे. मुलीवर आणखी काही अत्याचार झाले आहेत का, याचाही आता पोलीस तपास करत आहेत.मुलगी सज्ञान असल्याची कागदपत्रे पोलिसांकडे सादर केली असली, तरी मुलीनेच स्वत:चे वय १५ वर्षे असल्याचे सांगितल्याने वयाचा पेच निर्माण झाला आहे. तो वैद्यकीय तपासणीअंती सुटणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, अनिल व सीमा तलवार यांनी मुलगी १८ वर्षांची असून ती सज्ञान आहे. मुलीने केलेले आरोप खोटे व निराधार असल्याचे म्हटले आहे.

टॅग्स :Molestationविनयभंगkalyanकल्याण