शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

केडीएमसीच्या अभय योजनेचा फुसका बार, पालिकेचा दावा फोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2019 4:13 AM

कल्याण-डोंबिवली महापालिकेने मालमत्ताकराच्या वसुलीसाठी मालमत्ताधारकांकरिता अभय योजना लागू केली होती. सप्टेंबर ते नोव्हेंबर २०१८ या काळात ही योजना लागू होती.

- मुरलीधर भवारकल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेने मालमत्ताकराच्या वसुलीसाठी मालमत्ताधारकांकरिता अभय योजना लागू केली होती. सप्टेंबर ते नोव्हेंबर २०१८ या काळात ही योजना लागू होती. या योजनेच्या माध्यमातून महापालिकेच्या तिजोरीत एक हजार कोटी रुपये जमा होतील, असा दावा पालिका प्रशासनाने केला होता. प्रत्यक्षात हा दावा पुरता फोल ठरला आहे. या योजनेतून केवळ ६६ कोटी ३१ लाख रुपयांची वसुली करणे पालिकेला शक्य झाले आहे.महापालिकेने बिल्डरांसाठी ओपन लॅण्ड टॅक्समध्ये कराचे दर कमी करण्याचा ठराव मंजूर केला. त्यावरून प्रशासनाला टीकेचे लक्ष्य व्हावे लागले. बिल्डरांसाठी सूट दिली जाते आणि सामान्य नागरिकांच्या मालमत्ताकराच्या वसुलीसाठी जाचक पद्धती वापरल्या जातात. पालिका प्रशासनाने केवळ ओपन लॅण्डचा दर कमी केला नाही, तर बिल्डरांना अभय योजनाही लागू केली होती. केवळ बिल्डरांना अभय योजना लागू केल्यास आणखी अडचणी येण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने सावध पवित्रा घेत सरसकट सर्वच मालमत्ताधारकांना मालमत्ताकराची थकबाकी व दंडाची रक्कम भरण्यासाठी अभय योजना जाहीर केली. ओपन लॅण्ड टॅक्सचा विषय मंजूर होताच अभय योजना १८ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीसाठी लागू करण्यात आली. या योजनेत तीन टप्पे पाडण्यात आले. २५, ४० आणि ५० टक्के थकबाकीची रक्कम भरणाऱ्यांना मालमत्ताकराच्या व्याज व दंडाच्या रकमेत सूट दिली होती. अभय योजना जाहीर करताना मालमत्ताकराची एक हजार कोटी रुपयांची वसुली होईल, असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला होता. एक हजार कोटी वसूल झाले, तर त्यावर महापालिकेस १२० कोटींचे व्याज मिळू शकले असते. मात्र, अभय योजनेपश्चात पालिकेकडे केवळ ६६ कोटी ३१ लाख रुपये जमा झाले. त्यामुळे अभय योजनेतून पालिकेस फायदा झालेला नाही. या योजनेमध्ये सामान्य नागरिक आणि बिल्डरांनी किती रुपयांचा भरणा केला, याचे वर्गीकरणही पालिकेच्या मालमत्ता विभागाकडे नाही.अभय योजनेव्यतिरिक्त महापालिकेस चालू वर्षाच्या मालमत्ताकराची वसुलीही करायची आहे. त्यासाठी ३४० कोटी रुपये लक्ष्य ठेवलेले आहे. अभय योजनेचे लक्ष्य न गाठल्याने मालमत्ता विभागाला वसुलीसाठी आणखी परिश्रम घ्यावे लागतील.बिल्डरांकडून ओपन लॅण्ड टॅक्सच्या चालू मागणीसह थकबाकी धरून ४१९ कोटी रुपये येणे बाकी होते. बिल्डरांनी ५० टक्के रक्कम भरल्याशिवाय त्यांना अभय योजना लागू करू नये, असे तत्कालीन आयुक्तांनी म्हटले होते. या प्रमुख अटीकडे दुर्लक्ष करण्यात आले.जमिनीवरील कर ३२१ कोटी रुपये असून, त्यावरील व्याजाची रक्कम १५५ कोटी आहे. इमारतीच्या कराची मूळ रक्कम ३६१ कोटी रुपये असून, त्यावरील व्याजाची रक्कम १७९ कोटी रुपये आहे. दोन्ही मिळून १०१८ कोटींची वसुली अपेक्षित होती.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका