शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोविडच्या खर्चासाठी महापालिकांना जास्त अनुदान देण्याची फडणवीस यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 19:41 IST

फडणवीस यांनी पालिकेच्या तळमजल्यावर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मीरा भाईंदर मधील कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि मृत्युचे प्रमाण जास्त असल्याने त्यावर नियंत्रण करणे व व्यवस्थापन करणे आवश्यक असल्याचे म्हटले.

लोकमत न्युज नेटवर्कमीरारोड - महापालिका ह्या आर्थिक दृष्टय़ा सक्षम नसुन कोविड साठीचा सर्व खर्च पालिकांना करावा लागतोय. राज्य शासनाने 7 -8 कोटी रुपये दिले असले तरी ते अपुरे आहेत. त्यामुळे महापालिकांना जास्तीत जास्त अनुदान सारकारने द्यावे अशी मागणी विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी भाईंदर येथे पत्रकार परिषदेत केली. फडणवीस यांनी मीरा भाईंदर मधील कोरोना रुग्णांच्या तक्रारी मांडत पालिकेतील सत्ताधारी भाजपाला एकप्रकारे घरचा आहेरच दिला .  फडणवीस यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, आमदार रविंद्र चव्हाण, निरंजन डावखरे, प्रसाद लाड, महापौर ज्योत्सना हासनाळे, आयुक्त डॉ. विजय राठोड, सभागृह नेते रोहिदास पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे,  तसेच भाजपाचे नगरसेवक, पदाधिकारी आदिंसह भाईंदरच्या भिमसेन जोशी रुग्णालयात जाऊन आढावा घेतला. त्या नंतर महापालिकेत त्यांनी संबंधितां सोबत बैठक घेऊन शहरातील कोरोना संसर्गाची माहिती घेतली. आयुक्तांनी यावेळी पालिकेने केलेल्या व्यवस्थेचे सादरीकरण केले . फडणवीस यांनी पालिकेच्या तळमजल्यावर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मीरा भाईंदर मधील कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि मृत्युचे प्रमाण जास्त असल्याने त्यावर नियंत्रण करणे व व्यवस्थापन करणे आवश्यक असल्याचे म्हटले. आमचे सरकार असताना टेंबा रुग्णालय ताब्यात घेतले व व्यवस्था उभी केली जो शहराला आज मोठा आधार आहे. बाकी खाजगी रुग्णालयं आहेत.पण ज्या व्यवस्था आहेत त्या सुधारण्याची गरज असुन ऑक्सीजन बेड वाढवण्याची गरज आहे.  समन्वयाचा अभाव असुन चाचण्यांची तपासणी दुप्पट केली पाहिजे. चाचण्यांचे अहवाल 24 तासात आले पाहिजेत. रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी देखील एकास 20 झाली तर प्रसार रोखता येईल.पालिका आयुक्त सांगतात की खाटा उपलब्ध आहेत. पण एक महिला भेटली तीचे पतीला जोशी रुग्णालयात 10 - 12 तास दाखल केले नाही व त्यात त्याचा मृत्यु झाला. एका पत्रकारास लक्षणं असुन देखील रुग्णालयात दाखल केलेले नाही. पालिके कडे जागा आहे आणि लोकांना जागा मिळत नसेल व मृत्यु होणो बरोबर नाही.  त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर करुन यंत्रणा उभारा असे आयुक्तांना सांगीतले आहे.पालिकेच्या अलगीकरण कक्षात देखील वेळेवर जेवण मिळत नाही, स्वच्छता नाही आदी तक्रारी आहेत. मनुष्यबळाची कमतरता असुन ती दुर करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले आहे. खाजगी रुग्णालयातुन जास्त शूल्क वसुल केले जात असल्या बद्दल आयुक्तांनी समिती नेमुन बिलांचे ऑडिट करण्याचे आश्वासन दिल्याचे फडणवीस म्हणाले.