शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षण विरोधी काँग्रेसचा चेहरा समोर आला आहे : एकनाथ शिंदे

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: September 11, 2024 18:15 IST

आरक्षण रद्द करण्याची काँग्रेसची भूमिका असल्याचे त्यांनी बोलून दाखवले. पोटात जे असत ते ओठात आलेले आहे अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राहुल गांधी यांच्यावर केली. 

ठाणे : प्रत्येक वेळी विदेशात गेल्यावर आपल्या देशाची, देशातील जनतेची बदनामी करणे ही विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भूमिका कायम राहिलेली आहे. आज काँग्रेसचा आरक्षण विरोधी चेहरा समोर आला आहे. आरक्षण रद्द करण्याची काँग्रेसची भूमिका असल्याचे त्यांनी बोलून दाखवले. पोटात जे असत ते ओठात आलेले आहे अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राहुल गांधी यांच्यावर केली. 

मुख्यमंत्री शिंदे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना राहुल आणि काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. शिंदे पुढे म्हणाले की, काँग्रेसने बाबासाहेबांना धोका दिला, त्यांना धोका देऊन पराभूत केले. जे बाबासाहेबांना धोका देऊ शकतात ते आरक्षणाला कधीही धोका देऊ शकतात. बाबासाहेब नेहमी सांगायचे काँग्रेस हे जळकं घर आहे. बाबासाहेबांना जो काही अनुभव होता त्याच्यातून ते विचार मांडत होते. मात्र, याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. बाबासाहेबांनी आणि संविधानाने दिलेल्या जे आरक्षण आहे हे आरक्षण कायम राखण्यासाठी महायुती सरकार, एनडीए सरकार, राज्य सरकार, केंद्र सरकार या आरक्षणाच्या पाठीशी आहे. आरक्षण रद्द करण्याची हिम्मत जो करेल त्याच्या विरोधात केंद्र आणि राज्य सरकार उभे राहील. ज्यांना आरक्षण मिळाले आहे त्यांना काँग्रेसचा खरा चेहरा कळला असेल.

लोकसभेमध्ये याच लोकांनी संविधान बदलणार हे फेक नॅरेटिव्ह पसरवले.  बाबासाहेबांनी संविधानात दिलेले आरक्षण रद्द करणार असल्याचे आता लोकसभेच्या निकालानंतर हे लोक बोलत आहेत. राहुल गांधी हे काँग्रेस पक्षाचे प्रमुख आहेत, विरोधी पक्ष नेते आहेत त्यांनी देशाची बदनामी करणे, आपला देश मागे आहे आणि इतर देशाचा उदो उदो करणार हे कुठले देश प्रेम? ही कुठली राष्ट्रभक्ती? याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभक्तीची बात करतात आणि दुसरीकडे देशाचा अपमान करणारा वक्तव्य राहुल गांधी यांनी केलेला आहे म्हणून मी त्यांचा निषेध करतोय. संविधान विरोधी कोण हे यांच्या बोलण्यातून आज दिसलेला आहे . संविधानाला मानणारी जनता येणाऱ्या काळात काँग्रेसला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस