शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
3
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
4
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
5
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
6
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
7
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
8
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
9
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
10
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
11
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
12
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
13
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
14
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
15
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
16
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
17
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
18
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
19
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
20
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?

मुंब्य्रातून स्फोटकांचा साठा जप्त, तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2017 18:26 IST

मुंब्रा पोलिसांनी स्फोटकांचा साठा जप्त केला असून, याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. मुंब्रा येथील एका व्यक्तीशी आरोपींचा वैयक्तिक वाद होता. त्याचा काटा काढण्यासाठी आरोपींनी हा कट रचल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

ठाणे, दि. 7 - मुंब्रा पोलिसांनी स्फोटकांचा साठा जप्त केला असून, याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. मुंब्रा येथील एका व्यक्तीशी आरोपींचा वैयक्तिक वाद होता. त्याचा काटा काढण्यासाठी आरोपींनी हा कट रचल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.मुंब्रा-पनवेल मार्गावरील गौसिया कंपाऊंडसमोर स्फोटकांचा साठा असल्याची माहिती कल्याण येथील रेल्वे सुरक्षा दलास मिळाली होती. त्यानुसार रविवारी पहाटे 4.30 वाजताच्या सुमारास रेल्वे सुरक्षा दल, दहशतवादविरोधी पथक आणि शीळ डायघर पोलीस ठाण्याच्या अधिका:यांनी संयुक्त कारवाई करून स्फोटकांचा साठा जप्त केला. गौसिया कंपाऊंडसमोरील एम.डी. डेव्हलपर्सच्या आवारात एका भंगार कारमध्ये पोलिसांना प्लास्टिकच्या गोणीमध्ये 10 किलो अमोनियम नायट्रेट आणि पिवळय़ा रंगाची वायर लावलेले 9 सुप्रिम डिटोनेटर्स बेवारस स्थितीत आढळले. पोलिसांनी तातडीने सुत्रे हलवून अवघ्या 10 तासात याप्रकरणी तीन आरोपींना अटक केली. महिंसा राजेसाब गणुर उर्फ महेश (वय 40), शहाआलम मेहमूद शेख (वय 32) आणि आरिफ नवाबअली खान (वय 23) ही आरोपींची नावे असून, तिघेही मुंब्रा येथील रहिवासी आहेत. आरोपी महेश याचा जुन्या गाडींची खरेदी-विक्री करणारे मुंब्रा येथील रहिवासी इस्माईल शेख यांच्याशी आर्थिक वाद होता. त्यांना गंभीर गुन्ह्यात अडकवण्यासाठीच आरोपींनी हे कटकारस्थान रचले होते, अशी माहिती पोलीस उपायुक्त सत्यनारायण आणि डॉ. डि.एस. स्वामी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.