शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
4
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
5
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
6
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
7
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
8
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
9
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
10
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
11
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
12
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
13
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
14
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
15
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
16
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
17
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
18
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
19
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
20
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 

सच्च्या कार्यकर्त्यांचा उलगडला प्रवास, संवादसंध्येत ठाण्यात साधला संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 17:23 IST

विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या मान्यवरांमध्ये दडलेल्या अपरिचित कार्यकर्त्यांचा प्रवास उलगडण्यात आला.

ठळक मुद्दे सच्च्या कार्यकर्त्यांचा उलगडला प्रवाससंवादसंध्येत साधला संवादमला आजही क्रिकेटचे वेड आहे : जयवंत वाडकर

ठाणे : कार्यकर्ता या भूमिकेतून विविध क्षेत्रांत तळमळीने काम करुन लोकप्रिय झालेल्या सच्या कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधण्यात आला. यावेळी सिने नाट्य जगतातील परोपकारी मित्र जयवंत वाडकर, आनंदयात्रीच्या माध्यमातून विधायक कामे करणारा समाजसेतू किरण वालावलकर, मुरबाड - जव्हार - वाडा परिसरातील आदीवासींसाठी काम करणारे डॉ. अरुण पाटील, ग्रंथालय चळवळीत अविरत कार्यरत असणारे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व विद्याधर ठाणेकर यांनी आपल्या कार्याचा प्रवास उलगडला.          यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या ठाणे जिल्हा केंद्रातर्फे ‘मी कार्यकर्ता’ या संवादसंध्याचे मंगला हायस्कूल येथे आयोजन केले होते. जयवंत वाडकर म्हणाले, मला आजही क्रिकेटचे वेड आहे. मी आधीपासूनच कार्यकर्ता आहे. मला सुदैवाने चांगले दिग्दर्शक मिळाले. मला दामू केंकरे यांचा तुझ्यावाचून करमेना हा पहिला चित्रपट मिळाला. डिसेंबर पर्यंत एखादे नाटक करण्याचा मानस आहे असे सांगताना ते म्हमाले पुरस्कार तुम्हाला मिळाले पाहिजेत कारण ते तुम्हाला पुढे नेतात. तसेच, भविष्यात वेब सिरीजला चांगले दिवस असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. मुरबाड - जव्हार - वाडा परिसरातील आदीवासींसाठी काम करणारे डॉ. अरुण पाटील यांनी त्यांच्या कार्याचा प्रवास उलगडला. ते म्हणाले, कार्यकर्त्यामध्ये झोकून देऊन काम करण्याची वृत्ती असली पाहिजे. ग्रंथालय चळवळीत काम करणारे विद्याधर ठाणेकर यांनी मराठी ग्रंथ संग्रहालय वाचन संस्कृती वाढविण्यासाठी राबवित असलेल्या उपक्रमाची माहिती दिली. केवळ तरुणांनी नाही तर प्रत्येकाने वाचन केले पाहिजे असा सल्ला त्यांनी दिला. आनंदयात्रीच्या माध्यमातून काम करणारे किरण वालावलकर म्हणाले, कोणतेही काम करा पण ते झोकून करा असा कानमंत्र दिला. समारंभाध्यक्ष डॉ. महेश केळुस्कर म्हणाले, कार्यकर्ते हे तीन प्रकारचे असतात एक म्हणजे सतरंजी उचलणारे जे तिथेच राहतात दुसरे जे काहीही कार्य करीत नाही फक्त होर्डींग्ज लावतात आणि तिसरे म्हणजे शांतपणे काम करणारे असतात. लतिका भानुशाली आणि पौर्णिमा शेंडे यांनी या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी अध्यक्ष मुरलीधर नाले व सचिव अमोल नाले उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबईcultureसांस्कृतिक