शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

तज्ज्ञ डॉक्टर, फायर एनओसी नसतानाही रुग्णालयाला परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 23:44 IST

नोटीस बजावून कारवाई करणार । ठाणे पालिकेची माहिती

ठाणे : कोलशेत रोड येथे सुरू झालेल्या एका खाजगी हॉस्पिटलमध्ये कोविडच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. परंतु, सदर रुग्णालयाने कोणत्याही प्रकारे महापालिकेच्या किंवा अग्निप्रतिबंधक नियमांचे पालन केले नसताना आणि तज्ज्ञ डॉक्टर नेमले नसताना त्याला परवानगी कशी देण्यात आली, असा सवाल स्थानिक नगरसेवक संजय भोईर यांनी शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत उपस्थित केला. यानुसार, या रुग्णालयाची पाहणी करून नोटीस बजावून पुढील कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

शुक्रवारी महासभेप्रमाणेच स्थायी समितीची बैठकही आॅनलाइन घेण्यात आली. महासभेत ज्या पद्धतीने चर्चा न करता विषयांना मंजुरी देण्यात आली, तसे काही प्रकार स्थायी समितीच्या बैठकीत झालेले दिसून आले नाही. या बैठकीत कोविडचे अनेक विषय मंजुरीसाठी पटलावर ठेवले होते. त्या अनुषंगाने भोईर यांनी कोलशेत रोडवरील या रुग्णालयातील महत्त्वाच्या मुद्यांना हात घातला. हे रुग्णालय नुकतेच सुरू केले आहे. सध्या या ठिकाणी कोविड रुग्णांवर उपचार केले जात आहेत. परंतु, रुग्णालय सुरू करताना फायर एनओसी, फायरच्या नियमानुसार दोन जिने आवश्यक असताना तेदेखील नाहीत. फायरच्या दृष्टीने जे काही नियम पाळणे बंधनकारक आहे, त्याची कुठेही अंमलबजावणी केलेली नाही. त्यामुळे या रुग्णालयाला परवानगी दिलीच कशी, असा सवालही त्यांनी केला आहे. हॉस्पिटल सुरू करताना एमडी फिजिशिअन असणे आवश्यक असते.मात्र, तेदेखील येथे नेमले नाहीत. त्यामुळे अशा पद्धतीने रुग्णालय सुरूच कसे, असा सवाल त्यांनी केला. यावर प्रशासनाने नियमानुसार परवानगी देण्यात आली असून तीन महिन्यांत सर्व कागदपत्रे सादर करू, असे रुग्णालयाने सांगितले असल्याचे सांगितले. परंतु, ही प्रक्रिया रुग्णालय सुरू करण्यापूर्वीच होणे अपेक्षित होते, तसे झालेले नसल्याने सदर रुग्णालय प्रशासनाविरोधात कारवाई करावी, अशी मागणी यावेळी त्यांनी केली. त्यानुसार, आता सोमवारी संबंधित रुग्णालयाला नोटीस बजावण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले.

टॅग्स :thaneठाणे