शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

कोस्टल रोडच्या परवानग्यांसाठी ठामपा नेमणार तज्ज्ञ सल्लागार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 23:23 IST

प्रस्ताव तयार : स्थायी समितीच्या बैठकीत होणार निर्णय

ठाणे  : मागील कित्येक वर्षांपासून कागदावर असलेला मुंबई - नाशिक महामार्गावरील बाळकुम ते घोडबंदरमधील गायमुख चौपाटीपर्यंतचा कोस्टल रोड आता खऱ्या अर्थाने मार्गी लागण्याची चिन्हे दिसत आहेत. ठाणे महापालिकेने या रस्त्याचा आराखडा तयार करुन एमएमआरडीएकडे पाठवला आहे. याकामी आता पर्यावरण विभाग आणि इतर विभागांची परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे या कामासाठी तज्ज्ञ सल्लागारांची नेमणूक करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी १ कोटी ६८ लाखांचा खर्च करण्यात येणार असून, त्यासंदर्भातील प्रस्तावावर मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत विचारविनीयम होणार आहे. 

घोडबंदरमधील मुंबई - अहमदाबाद महामार्गावरील अवजड वाहनांचा भार कमी होऊन कोंडी सुटण्यास कोस्टल रोडमुळे मदत होणार आहे. या मार्गावरून अवजड वाहतूक सोडली जाणार आहे. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये घोषणेपलीकडे काहीच झाले नव्हते. दरम्यान, आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी या प्रकल्प आराखड्याचे काम तत्काळ पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने आराखडा तयार केला असून, तो मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे पाठवला आहे. हा मार्ग सुमारे १३ किमीचा  आहे. 

महापालिकेच्या विकास आराखड्यानुसार हा ४० ते ४५ मीटरचा आठ पदरी रस्ता आहे. त्यामध्ये अत्यावश्यक सेवेतील वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका राहणार आहे.  १.१३ किमीचा उन्नत मार्ग, ५०० मीटरचा भुयारी मार्ग, तसेच  वाघबीळ भागात जाण्यासाठी मार्गिका राहणार आहे. एकूण मार्गापैकी  ७.२९ किमीचा मार्ग सीआरझेड भागातून जाणार आहे. या प्रकल्पासाठी १२०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. 

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका