शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

मोहिमेवर साडेतीन कोटींचा खर्च, दुहेरी लेनचा नवीन पूल बांधणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 04:01 IST

पत्री पूल तोडण्याचे नियोजन खूप दिवसांपासून सुरू होते. पूल जुना असल्याने त्याचे गर्डर फसण्याची शक्यता होती. गेल्या तीन दिवसांपासून या गर्डरचे जोड सैल करण्याचे काम आधी करण्यात आले.

- प्रशांत मानेकल्याण : पत्री पूल तोडण्याचे नियोजन खूप दिवसांपासून सुरू होते. पूल जुना असल्याने त्याचे गर्डर फसण्याची शक्यता होती. गेल्या तीन दिवसांपासून या गर्डरचे जोड सैल करण्याचे काम आधी करण्यात आले. पत्रीपुलाच्या या पाडकामासाठी तब्बल साडेतीन कोटी रुपये खर्च झाले.कमीतकमी वेळेत पूल पाडण्याचे आमचे उद्दिष्ट होते, जेणेकरून मेगाब्लॉकचा रस्ते वाहतुकीवर जास्त परिणाम होऊ नये. अनेक लोकल, मेल-एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे दोन क्रेनच्या साहाय्याने हे काम करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक एस.के. तिवारी यांनी दिली. या मोहिमेसाठी साडेतीन कोटी रुपये खर्च आला. जुना पूल धोकादायक झाल्याचे तज्ज्ञांच्या माध्यमातून सांगण्यात आले होते. हा पूल दुरु स्त करून वापरावा, अशा स्थितीतही नव्हता. त्यामुळे पूल पाडण्याचा निर्णय घेण्यात आला. एमएसआरडीसी आता याठिकाणी नवीन पूल बांधणार असून तो दोन लेनचा असणार आहे. त्याला रेल्वेने मंजुरी दिली असून बांधकामाला लवकरच सुरुवात होईल, अशी माहिती तिवारी यांनी दिली. या मोहिमेत एस.के. अग्रवाल, आर.के. गोयल, राजीव मिश्रा, डॉ. ए.के. सिंग यांच्यासह ३०० कर्मचारी आणि ५० अभियंत्यांचे विशेष योगदान मिळाल्याचे तिवारी यांनी सांगितले.अखेर पूल पाडण्यात आलाअंधेरी येथील पूल दुर्घटनेनंतर रेल्वेच्या सर्वच पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात आले होते. २० जुलैला केलेल्या तपासणीत पत्रीपूल धोकादायक असल्याचे समोर आले. त्यामुळे आधी अवजड वाहतुकीसाठी आणि २२ आॅगस्टपासून सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूल कायमस्वरूपी बंद करण्यात आला.मुंब्रा बायपासचे काम पूर्ण झाल्याने २५ सप्टेंबर रोजी पत्री पुलावरचा डांबरी रस्ता उखडण्यात आला. हा पूल अडीच महिने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. अखेर, रविवारी हा पूल पाडण्याचे काम करण्यात आले.दरम्यान, केडीएमसीचा नवीन पूल बांधण्यात आल्यानंतर २००४ सालीच जुना पूल पाडण्यात येणार होता; पण त्याला तब्बल १४ वर्षे विलंब लागला, अशीही माहिती अधिकारी सूत्रांनी दिली.रेल्वेने नोंदवला विक्रमरेल्वेचे दुरुस्तीकाम असो, अथवा पूल उभारणीची कामे, यासाठी १० ते १२ तासांचे ब्लॉक घेतले जात असताना पत्रीपुलाच्या पाडकामासाठी रेल्वेने केवळ सहा तासांचा मेगाब्लॉक घेतला होता. प्रत्यक्षात, त्याआधीच पुलाचे पाडकाम करण्यात आले. मेगाब्लॉकची वेळ संपण्यापूर्वी तब्बल ५५ मिनिटे आधी लोकलसेवा सुरू करून रेल्वेने एक प्रकारे विक्रमच नोंदवला आहे.कोंडी सुटण्यासाठी लवकरच पुलांची निर्मितीकल्याण-डोंबिवलीला सद्य:स्थितीत भेडसावणारी वाहतूककोंडीची समस्या निकाली काढण्यासाठी नव्याने बांधल्या जाणाऱ्या पत्रीपुलासह पलावा येथेही पूल बांधला जाणार आहे. एमएसआरडीसी या पुलांचे बांधकाम करणार आहे. जुन्या पत्रीपुलाच्या ठिकाणी लवकरच नवीन पूल बांधायला घेतला जाणार असल्याची माहिती कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली.खा. शिंदे यांच्यासह माजी महापौर आणि विद्यमान नगरसेवक राजेंद्र देवळेकर, नगरसेवक दीपेश म्हात्रे, गटनेते दशरथ घाडीगावकर, रमेश जाधव आदींनी पुलाच्या पाडकामाच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. यावेळी खासदार शिंदे बोलत होते. कल्याण-शीळचे सहापदरीमार्गाचे कामदेखील लवकरच सुरू होईल. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीकरांना दिलासा मिळेल, अशी आशा शिंदे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :kalyanकल्याण