शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विद्यमान १०० नगरसेवक रिंगणात

By admin | Updated: February 7, 2017 04:07 IST

ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत यंदा सर्वपक्षीयांमधील तब्बल १३० आणि ५ स्वीकृत अशांपैकी १०० नगरसेवक पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात आपले नशीब आहेत

ठाणे : ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत यंदा सर्वपक्षीयांमधील तब्बल १३० आणि ५ स्वीकृत अशांपैकी १०० नगरसेवक पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात आपले नशीब आहेत. दुसरीकडे निवडणुकीत ५० टक्के आरक्षण महिलांना मिळाले आहे. त्यानुसार, शिवसेनेने महिलांना तब्बल ५५ टक्के आरक्षण दिले असून त्याखालोखाल भाजपा आणि काँग्रेसने ५२ टक्के आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केवळ ४५ टक्के महिलांना उमेदवारी दिली आहे. तर, मनसेनेदेखील ४८ टक्के महिलांना निवडणुकीत संधी दिली आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले असून आता ७ फेब्रुवारीनंतर प्रत्यक्षात रिंगणात किती उमेदवार शिल्लक राहणार, हे स्पष्ट होणार आहे. असे असले तरी सध्या ठाणे महापालिकेच्या ३३ प्रभागांतून १३१ उमेदवार निवडून पालिकेत जाणार आहेत. दरम्यान, ठाणे महापालिकेच्या विद्यमान १३५ (१३० + ५) नगरसेवकांपैकी १०० विद्यमान नगरसेवक पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. १५ नगरसेवकांना तिकीट मिळाले नसले, तरी त्यांनी आपली पत्नी, वहिनी, भाऊ यांना रिंगणात उतरवले आहे. भाजपाने आपल्या पाच विद्यमान नगरसेवकांना तिकीट दिले असून सेना, राष्ट्रवादी, मनसे आणि काँग्रेसमधून आयात केलेल्या १० जणांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेने ४२ विद्यमान नगरसेवक रिंगणात उतवले असून इतर पक्षांतून आलेल्या १० जणांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीचे ३४ पैकी ८ नगरसेवक शिवसेना-भाजपात दाखल झाले असून उर्वरित नगरसेवकांपैकी २३ जणांना पुन्हा तिकीट मिळाले आहे. तर, १७ नगरसेवक असलेल्या काँग्रेसची पूर्ण वाताहत झाली असून त्यांचे फक्त ४ विद्यमान नगरसेवक पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत. मनसेच्या सातपैकी सहा नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने पक्षासोबत असलेल्या एकमेव नगरसेविकेला त्यांनी उमेदवारी दिली. दरम्यान, महापालिकेत ५० टक्के म्हणजेच ६६ जागा महिलांसाठी राखीव आहेत. (प्रतिनिधी)