शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांग विद्यार्थ्यांनी बनविलेल्या वस्तूंचे प्रदर्शन, विक्री मेळावा जल्लोषात

By सुरेश लोखंडे | Updated: December 22, 2023 19:31 IST

येथील मध्यवर्ती विक्री केंद्राची स्थापना जिल्हा परिषदेच्या आवारात करून यख दिव्यांग विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळेमध्ये बनविलेल्या गृहपयोगी व शोभेच्या वस्तूंसाठीचा विक्री मेळावा सुरू करण्यात आला आहे.

सुरेश लोखंडे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे :  जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाने ५ टक्के दिव्यांग कल्याण सेस फंडातून या वर्षामध्ये राबविण्यास घेण्यात आलेल्या उपक्रमातून दिव्यांग व्यक्तिने, दिव्यांगाच्या संस्थेने तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री मेळावा जि प.च्या आवारात आजपासून सुरू झाला. या प्रदर्शनाचे उद्घाटन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते यांच्या  हस्ते करण्यात आले. 

येथील मध्यवर्ती विक्री केंद्राची स्थापना जिल्हा परिषदेच्या आवारात करून यख दिव्यांग विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळेमध्ये बनविलेल्या गृहपयोगी व शोभेच्या वस्तूंसाठीचा विक्री मेळावा आज पासून सुरू  करण्यात आला आहे.  हे प्रदर्शन व विक्री मेळावा २६ डिसेंबर  या दरम्यान सकाळी ९ वाजेपासून ते रात्री ८ वाजेपर्यंत आहे. ठाणे शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेले जिल्हा परिषद, प्रांगण, ठाणे स्टेशन, ठाणे (प) येथे आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनास व विक्री मेळाव्यास भेट देऊन दिव्यांग विद्यार्थ्यांनी व संस्थानी बनविलेले वस्तु खरेदीसाठी ठाणेकर ग्राहकांनी प्रतिसाद द्यावे , असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रगती अंध विद्यालय, बदलापुर येथिल दिव्यांग विद्यार्थ्यांनी विविध गाणी गाऊन प्रदर्शनाची व विक्री केद्रांची शोभा वाढवली. स्टॉलवर विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या वस्तूंमध्ये तोरण, रुमाल पेंटिंग, कार्ड फुले, ग्रीटिंग कार्ड, कृत्रिम गजरे, ज्वेलरी, कागदी फुले, कापडी पिशवी, फाईल, दिव्यांग उपयोगी काठी व इतर सर्व वस्तूचा समावेश आहे. प्रदर्शन व विक्री करण्यासाठी एकूण १८ विक्री कक्ष (स्टॉल) उभारण्यात आले आहेत. यावेळी कार्यकारी अभियंता बाधंकाम सुनिल बच्छाव, लघुपाट बंधारे विभाग प्रमुख दिलीप जोकार, उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी  अजंली अंबेकर, इतर सर्व अधिकारी, कर्मचारी, दिव्यांग शाळेचे विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणे