शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

लॉकडाऊनमध्ये थकली २२१ कोटींची वीजबिले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 23:25 IST

ग्राहकांना अचूक बिले पाठविल्याचा महावितरणचा दावा

डोंबिवली : कल्याण परिमंडळात लॉकडाऊनमुळे जवळपास अडीच महिने बंद असलेले वीज मीटर रीडिंग व वीजबिलांचे वाटप सुरू झाले आहे. प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर भागांत मीटर रीडिंगनंतर ग्राहकांच्या वीज वापरानुसार अचूक व एकत्रित वीजबिल देण्यात येत आहे. कल्याण परिमंडळातील लघुदाब ग्राहकांकडे वीजबिलापोटी तब्बल २२१ कोटी थकल्याने महावितरणला आर्थिक चणचण भेडसावत आहे. ग्राहकांनी वीजभरणा करून सहकार्य करण्याचे आवाहन मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांनी मंगळवारी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केले आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. त्यानंतर वीज नियामक आयोगाने दिलेल्या निर्देशांनुसार महावितरणने मीटर रीडिंग व वीजबिल वाटप बंद केले. एप्रिल व मे महिन्यांत मीटर रीडिंग घेणे शक्य झाले नसल्याने जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांतील वीज वापराच्या सरासरी युनिटप्रमाणे या दोन्ही महिन्यांचे बिल आकारले. एप्रिल व मे महिन्यांत लॉकडाऊन व वाढत्या तापमानामुळे प्रत्यक्षात विजेचा अधिक वापर होता. मात्र, कमी वीज वापर असणाऱ्या महिन्यातील सरासरीप्रमाणे वीजबिल आकारल्याचा दावा महावितरणने केला आहे.आता प्रतिबंधित भाग वगळता इतर ठिकाणी मीटर रीडिंग घेऊन प्रत्यक्ष वीज वापराप्रमाणे अडीच महिन्यांचे एकत्रित बिल देण्यात येत असताना हे बिल अधिक असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. एकत्रित दिलेल्या बिलात विभाजन करून ग्राहकांना बील भरण्यासाठी काहीशी सवलत दिली आहे. मीटर रीडिंग व वीजबिल यात तफावत असणारी बिले दुरुस्त करून देण्यात येतील. तसेच लॉकडाऊनमध्ये ग्राहकांनी भरलेल्या रकमेची वीजबिलातून कपात केली आहे. यासंदर्भातील सर्व माहितीही वीजबिलात देण्यात आली आहे.कार्यालयातील गर्दी टाळा : वीजबिलाची दुय्यम प्रत मिळविणे व बिलाच्या दुरुस्तीसाठी वीजग्राहक महावितरणच्या विविध कार्यालयांत सध्या गर्दी करीत आहेत. नोंदणीकृत मोबाइलवर आलेला ‘एसएमएस’ दाखवूनही बिल भरणा केंद्रात वीजबिल भरता येते. तसेच, तक्रारीसाठी महावितरणच्या संकेतस्थळाचा अथवा मोबाइल अ‍ॅपचा वापर करावा. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्राहकांनी कार्यालयात गर्दी करू नये, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

टॅग्स :electricityवीज