शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील दारू अड्यावर उत्पादन शुल्क विभागाचे धाडसत्र: रसायनासह दहा लाखांचा मुद्देमाल नष्ट

By जितेंद्र कालेकर | Updated: July 4, 2024 18:49 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क ठाणे: ठाणे जिल्हयात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हातभट्टी दारु निमिर्तीच्या अड्डयावर धाडसत्र सुरुच आहे. ठाण्यातील देसाई ...

लाेकमत न्यूज नेटवर्कठाणे: ठाणे जिल्हयात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हातभट्टी दारु निमिर्तीच्या अड्डयावर धाडसत्र सुरुच आहे. ठाण्यातील देसाई खाडी परिसरात असलेल्या गावठी दारुच्या अड्डयांवर भरारी पथकाने धाड टाकून गावठी दारुसह दारुच्या निमिर्तीसाठी लागणाऱ्या रसायनासह दहा लाख १५ हजारांचा मुद्देमाल नष्ट केल्याची माहिती काेकण विभागीय उपायुक्त प्रदीप पवार यांनी गुरुवारी दिली.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डाॅ. विजय सूर्यवंशी यांनी दिलेल्या आदेशानुसार हातभट्टी दारूचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ३ जुलै २०२४ राेजी ही धाडसत्र माेहीम राबविण्यात आली. त्याच अनुषंगाने विभागीय उपायुक्त प्रदीप पवार आणि ठाण्याचे अधीक्षक डाॅ. निलेश सांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाने देसाई खाडीमध्ये असलेल्या हातभट्टी दारू निर्मिती ठिकाणांवर धाड टाकून ती उद्ध्वस्त केली. या कारवाईमध्ये ११ बेवारस िठकाणी गुन्हे नोदविले आहेत. त्याठिकाणी ३५ लीटर हातभट्टी दारू आणि २० हजार २०० लीटर रसायन तसेच इतर साहित्यासह मुद्देमाल नष्ट केला. या मोहिमेमध्ये विभागीय उप आयुक्त पवार यांनी स्वतः आपल्या पथकांसह तीन बोटींमधून जाऊन खाडीतील हातभट्टी निर्मिती ठिकाणे उद्ध्वस्त केली. ही हातभट्टी दारू निर्मिती ठिकाणे चालवणाऱ्यांचा शाेध घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याच्या तसेच एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. यानंतरही अशा कारवाई चालूच ठेवून हातभट्टी दारू निर्मिती ठिकाणे समूळ नष्ट करणार असल्याचा दावाही पवार यांनी केला आहे.