शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडी-वाडा महामार्गावर खोदकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 00:30 IST

माती रस्त्यावर येऊ न चिखल : गाड्या स्लीप होऊन अपघात होण्याची भीत

वाडा : भिवंडी तालुक्यातील अंबाडी, खरिवली व वाडा तालुक्यातील घोणसई येथे २२/२२ व ३३ केव्हीएम वीजउपकेंद्राचे काम सुरू असून या केंद्रासाठी तालुक्यातील भावेघर या केंद्रातून वीज पुरवठा केला जाणार आहे. त्यासाठी भिवंडी वाडा महामार्गालगत वीजवाहिनी खोदाईचे काम संबंधित ठेकेदाराने भर पावसाळ्यात सुरू केले आहे. या कामामुळे खोदकामामुळे माती रस्त्यावर पडून पावसामुळे इतरत्र पसरून चिखलाचे साम्राज्य पसरते. त्यामुळे हे काम तत्काळ बंद करावे, अशी मागणी प्रवासी करत आहेत.अंबाडी, खिरवली व घोणसई येथे २२/२२ व ३३ या क्षमतेच्या वीजउपकेंद्राचे काम सुरू असून या वीज केंद्रासाठी भावेघर येथील वीजकेंद्रातून विजेचा पुरवठा केला जाणार आहे. त्यासाठी अंबाडी ते भावेघर या अंतरापर्यंत जमिनीखालून वीजवाहिनी टाकण्याचे काम लीना पॉवर या कंपनीने सुरू केले आहे. पावसाळ्यात रस्त्याच्या बाजूला खोदकाम करू नये, असा नियम असताना संबंधित कंपनीने नियम धाब्यावर बसवून भर पावसाळ्यात वाहिनी खोदाईचे काम सुरू केले आहे. त्यामुळे खोदकाम केलेली माती ही रस्त्यावर पडून पावसात चिखल झाल्याने दुचाकी स्लीप होऊ न अपघात होत आहेत. काही दुचाकीस्वार गाडी स्लीप होऊन पडले आहेत. मात्र त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही.खोदकाम करताना कंपनीने रस्त्याच्या मध्यापासून १५ मीटर अंतरावर खोदकाम करण्याचा नियम आहे. हा नियम पायदळी तुडवून कंपनीने १५ मीटरच्या आत रस्त्यावरच खोदकाम केले जात असल्याचा आरोप प्रवाशी करीत आहेत. वीजवाहिनीचे काम पावसाळ्यात थांबवून ते पावसानंतर करावे, अशी मागणी या रस्त्यावरून येणारे जाणारे प्रवासी करत आहेत.नियम डावलून कामवीज वाहिनीची खोदाई १.२० मीटर खोल अंतरापर्यत करण्याचा शासनाचा नियम आहे. मात्र कंपनीने हा नियमही पायदळी तुडवून कमी खोदाई करीत आहे. खोदकाम केल्यानंतर खाली वाळू टाकून नंतर वाहिनी मग त्यावर कव्हर टाकले जाते. यासंदर्भात लीना पॉवरचे अधिकारी स्वप्नील मैड यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने ठरवून दिलेल्या जागेवरच काम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.वीजवाहिनीसाठी रस्त्यावर सुरू केलेले खोदकाम तत्काळ थांबवण्यात यावेत अशा प्रकारचे आदेश संबंधित कंपनीला देण्यात आले आहेत. तत्काळ काम न थांबवल्यास कारवाई करण्यात येईल.- ए. एम. बरसट,शाखा अभियंतासार्वजनिक बांधकाम विभाग, वाडा.