शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

मीरारोड येथील शूटिंग बंद पाडून सेटचे सामान नेल्याप्रकरणी माजी आमदार वादात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2022 18:36 IST

गुरुवारी पालिकेच्या रस्त्यावर शूटिंग सुरू असताना नरेंद्र मेहतांनी व त्यांच्या माणसांनी शूटिंग बंद पाडले.

मीरारोड - मीरारोडच्या कनकीया भागात महापालिका व पोलिसांच्या परवानगीनंतर शूटिंग सुरु असताना ते बंद पाडून सेट चे सामान स्वतःच्या ७११ क्लबच्या आवारात ठेवायला लावल्याने गुन्हा दाखल करण्याची तक्रार झाल्याने भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहता पुन्हा वादात सापडले आहेत. 

कनकिया येथील पार्क व्ह्यू हॉटेल ते तिवारी कॉलेजपर्यंतच्या महापालिकेच्या रस्त्यावर दूरचित्रवाहिनीच्या छायाचित्रणासाठी महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी परवानगी दिली होती. त्याचे शुल्क परवानगी घेणाऱ्या आर. के. ड्रीम्स यांनी भरलेले होते. 

गुरुवारी पालिकेच्या रस्त्यावर शूटिंग सुरू असताना नरेंद्र मेहतांनी व त्यांच्या माणसांनी शूटिंग बंद पाडले. इतकेच नव्हे तर शूटिंगच्या सेटचे सामान सुद्धा बळजबरीने उचलून  मेहतांच्या ७११ क्लबच्या आवारात नेऊन ठेवण्यात आले. त्यामुळे संबंधित कंपनीच्या रोहित गुप्ता सह छितरमल गुप्ता यांनी मीरारोड पोलिसांसह महापालिकेस मेहतां विरोधात गुन्हा दाखल करण्याची तक्रार दिली आहे. पोलीस घटनास्थळी गेल्यानंतर क्लबच्या आवारात ठेवलेले शुटिंगचे सामान परत करण्यात आले. 

परवानगी असून सुद्धा मेहता हे त्यांना कोणताच अधिकार नसताना दमदाटी व गुंडगिरी करत शूटिंग बंद पडतात व सामान उचलून घेऊन जातात. या आधी सुद्धा मेहतांनी असा प्रकार केल्याबाबत तक्रारी पोलिसात दिल्या आहेत. पोलिसांनी व शासनाने गंभीर दाखल घेऊन तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी आम्ही केली आहे. ह्या सर्व प्रकारच्या अनेक व्हिडीओ क्लिप सुद्धा पुरावा म्हणून देण्यात आल्या आहेत असे छितरमल गुप्ता म्हणाले. तर रात्री मेहतांची गाडी रस्त्यात आडवी लावून एकाबाजूला रस्ता बंद करण्याचा प्रकार सुद्धा पोलिसांना कळवला आहे असे त्यांनी सांगितले. 

छितरमल गुप्ता यांनी दिल्लीच्या नेशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो कडे मेहतांवर दाखल गुन्ह्यांची माहिती देत कारवाईची मागणी केली आहे. त्याची दखल ब्युरो ने घेत राज्य गुन्हे अन्वेषण विभाग पुणे यांना कळवले. त्यानुसार राज्य गुन्हे अन्वेषण तांत्रिक सेवा विभागाचे पोलीस अधिक्षक अरविंद चावरिया यांनी मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तांना पत्र पाठवून मेहतांवर योग्य ती कारवाई करण्यास कळवले आहे. दरम्यान परवानगी असून सुद्धा शूटिंग बंद पाडण्याच्या प्रकारां बाबत मे महिन्यातच महापालिकेने सर्व  पोलीस ठाण्याना शूटिंग वेळी धमकी देणारे वा पैशाची मागणी करणाऱ्यांवर योग्य कारवाई करण्याची पत्रे दिली होती.   

टॅग्स :mira roadमीरा रोड