शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात स्मशानभूमीत माजी नगरसेवकाचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 00:00 IST

महापालिकेने खरेदी केलेल्या कचऱ्याच्या डब्याच्या निषेधार्थ माजी नगरसेवक दिलीप मालवणकर हे चक्क स्मशानभूमीत उपोषणाला बसणार आहेत.

उल्हासनगर : महापालिकेने खरेदी केलेल्या कचऱ्याच्या डब्याच्या निषेधार्थ माजी नगरसेवक दिलीप मालवणकर हे चक्क स्मशानभूमीत उपोषणाला बसणार आहेत. पालिका आयुक्तांनी डब्बे खरेदीचे निविदा रद्द केली नाहीतर, न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा दिला.उल्हासनगर महापालिकेने शहर स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी, तसेच ओला-सुका कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी 6 कोटीच्या निधीतून कचऱ्याचे  3 लाख 44 हजार डब्बे खरेदी करण्यासाठी निविदा काढली. मात्र पालिकेत एकूण 1 लाख 72 हजार मालमत्ताधारक असून त्यापैकी 25 ते 30 टक्के मालमत्तेचा थांगपत्ता नाही. तसेच 40 हजार मालमत्ता वाणिज्य वापराच्या आहेत. मग 1 लाख 72 मालमत्ता गृहीत धरून कचऱ्याचे दोन डब्बे देणार का?,असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच एक डब्याची 175 तर दोन डब्याची किंमत 350 रुपये दाखविली आहे. त्याच डब्याची किंमत बाजारात 70 ते 90 रुपये असल्याचे बिल मालवणकर यांनी सोशल मीडियावर टाकले .एकूणच कचऱ्याचे डब्बे खरेदीत मोठा घोळ असल्याचा आरोप करून निविदा रद्द करण्याची मागणी केली. त्या 6 कोटीच्या निधीतून भूखंड विकत घेउन कायमस्वरूपी प्रकल्प उभारण्याचा सल्ला दिला. महापालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर काहीएक निर्णय घेत नसल्याच्या निषेधार्थ मालवणकर यांनी उपोषनाचा इशारा दिला होता. त्यांनी अचानक कॅम्प नं 4 येथील स्मशानभूमीत सोमवारी उपोषण करणार असल्याचे, रात्री उशिरा जाहीर केले. या प्रकाराने सर्वांना धक्का बसला असून मनसे, पीआरपी यांच्यासह विविध सामाजिक संस्थेने उपोषणाला पाठिंबा दिला आहे.