शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दर महिन्याला आरटीआयचे ४०० अर्ज, ठाणे पालिकेतील आकडेवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 01:50 IST

ठाणे महापालिकेचे कंत्राटदार संकेत जाधव यांनी रविवारी स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केल्यानंतर आता पालिकेत माहिती मागणारे तथाकथित माहिती अधिकार कार्यकर्तेदेखील उजेडात येण्याची शक्यता आहे.

ठाणे : ठाणे महापालिकेचे कंत्राटदार संकेत जाधव यांनी रविवारी स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केल्यानंतर आता पालिकेत माहिती मागणारे तथाकथित माहिती अधिकार कार्यकर्तेदेखील उजेडात येण्याची शक्यता आहे.जाधव यांना या कथीत कार्यकर्त्यांचादेखील त्रास असल्याची भीती मित्रमंडळींनी व्यक्त केल्याने, आता ते अडचणीत येण्याची शक्यता वाढली आहे. दीड महिन्यापूर्वीच आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अशा आरटीआय कार्यकर्त्यांची माहिती मागविली होती. त्यानुसार येत्या चार ते पाच दिवसात वादग्रस्त पद्धतीने माहिती मागविणाºया कथित माहिती अधिकार कार्यकर्त्यांची संपूर्ण माहिती समोर येणार आहे.जाधव यांनी आत्महत्या केल्यानंतर पालिकेतील अर्थकारण पुन्हा एकदा समोर आले आहे. आजी माजी नगरसेवकांनी कामात खोडा घालण्याचा प्रयत्न, पालिकेतील तथाकथीत आरटीआय कार्यकर्त्यांचे ब्लॅकमेलींग, शिवाय चाकण येथील गृहप्रकल्पाच्या मुद्यावरून जाधव अस्वस्थ असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी आणि त्यांच्या मित्रमंडळीनी व्यक्त केली. काही वर्षापासून पालिकेत अशा आरटीआय कार्यकर्त्यांची चलती असल्याचे दिसते. पालिकेतील कामांची माहिती मागवायची त्यानंतर अधिकारी, विकासक, ठेकेदारांना ब्लॅकमेल करणारी मोठी साखळी कार्यरत आहे. पालिका आयुक्तांनी वादग्रस्त पद्धतीने माहिती मागविणाºया आरटीआय कार्यकर्त्यांची माहिती दीड महिन्यापूर्वी अधिकाºयांकडून मागवली होती. यानुसार प्रत्येक विभागाकडून तशी माहिती गोळा करण्याचे काम सुरू असल्याचे आस्थापना विभागाने स्पष्ट केले. पालिका मुख्यालय, प्रभाग समिती, आॅनलाईन पद्धतीने आलेल्या अर्जांची छाननी केली जाणार आहे. सध्या तीन ते चार विभागांची माहिती अद्याप उपलब्ध न झाल्याने पुढील दिशा ठरविण्यात आली नसल्याचेही सांगण्यात येते. यात एखाद्या माहिती अधिकार कार्यकर्त्याने वादग्रस्त माहिती मागितली असेल तर त्यांची नावे शोधली जाणार आहेत. एकाच व्यक्तीने किती वेळा कोणकोणत्या विभागात कशा पद्धतीने अर्ज केले आहेत, याचीदेखील माहिती गोळा केली जात आहे. त्यानुसाार पुढील चार ते पाच दिवसात ती गोळा करुन त्यानुसार पुढील दिशा ठरविली जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका