शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पारंपरिक पर्यावरणस्नेही कंदिलांंचाच ठाण्यात बोलबाला; कोरोनामुळे यंदा केवळ ३० टक्के कंदीलच विक्रीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2020 00:17 IST

Thane : नवरात्रोत्सवानंतर वेध लागले ते दिवाळी सणाचे. अवघ्या १२ दिवसांवर हा सण येऊन ठेपला आहे. नोव्हेंबरच्या दुसरा आठवड्यात दिवाळी आली आहे. यानिमित्ताने घरात साफसफाईस सुरुवात झाली आहे.

ठाणे : अवघ्या काही दिवसांवर दिवाळी हा सण आला आहे. परंतु, या सणावर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे कंदिलांची खरेदी होईल की नाही, या भीतीने केवळ ३० ते ४० टक्केच कंदील विक्रीसाठी उपलब्ध केले आहे. ठाणेकरांची कायम पसंती असलेल्या पर्यावरणस्नेही कंदिलांचाच बोलबोला ठाण्याच्या बाजारपेठांत पाहायला मिळत आहे. सध्या मोठ्या कंदिलांचे बुकिंग झालेे असून शेवटच्या दिवसांत घरी लावण्यात येणारे कंदिलांची विक्री होईल, अशी शक्यता विक्रेत्यांनी वर्तवली आहे.नवरात्रोत्सवानंतर वेध लागले ते दिवाळी सणाचे. अवघ्या १२ दिवसांवर हा सण येऊन ठेपला आहे. नोव्हेंबरच्या दुसरा आठवड्यात दिवाळी आली आहे. यानिमित्ताने घरात साफसफाईस सुरुवात झाली आहे. कोरोनामुळे हळूहळू का होईना बाजारपेठाही सजण्यास सुरुवात झाली आहेत, ठिकठिकाणी कंदिलांव्यतिरिक्त रांगोळी, उटणे, पणत्या, फराळांनी बाजारपेठांमध्ये विक्री होईल. अद्यापही कोरोनाचे सावट गेले नसल्याने ठाणेकरांनी यंदा दिवाळी साधेपणाने साजरी करण्याचे ठरविले आहे. यावेळेस खरेदीविक्रीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. ठाणेकरांना नेहमीच पारंपरिक कंदील आकर्षित करीत असतात. त्यामुळे या कंदिलातच विविध प्रकार बनविण्यात आले आहे. त्यात चारकोन, पंचकोन, षटकोन, सप्तकोन, अष्टकोन, मटकी हे प्रकार पाहायला मिळत आहे. गेल्यावर्षीप्रमाणे यंदा पारंपरिक कंदिलांनाच मागणी आहे. कपडा, बांबू, लाकडाच्या पट्ट्यांपासून ते बनविले आहेत. तीन इंचांपासून पाच फुटांपर्यंतचे कंंदील तयार केले असून २० रुपयांपासून दोन हजारांपर्यंत उपलब्ध आहेत.

फ्लोरोसन्स कलरची भुरळनेहमीच्या रंगांना बाजूला सारत कंदिलांमध्ये फ्लोरोसन्स कलर पाहायला मिळत आहे. या रंगाच्या कंदिलांनी ठाणेकरांना भुरळ घातली आहे. मल्टिमिक्स रंगांचे कंदीलही विक्रीसाठी आहेत. यामध्ये यंदा निळा रंग प्रामुख्याने पाहायला मिळत आहे. पारंपरिक कंदिलांप्रमाणे बांबू, झुंबर, चेंडू कंदील यात पाहायला मिळत आहे.

चायनाच्या वस्तू बंद व्हाव्यात आणि गल्लोगल्ली पारंपरिक भारतीय कंदील दिसावे, हा आमचा उद्देश आहे. कोरोनामुळे कंदील खरेदी होईल की नाही, ही शंका असल्याने यंदा ३० टक्केच कंदील बनविले आहे.    - कैलाश देसले, हस्तकलाकार

 

टॅग्स :thaneठाणेDiwaliदिवाळी