शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

७१ वर्षांनंतरही उल्हासनगर भकासच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 00:43 IST

आज वर्धापन दिन : विकासाच्या नावाने बोंब

सदानंद नाईक ।उल्हासनगर : शहर स्थापनेला शनिवारी ७१ वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र, इतक्या वर्षांत विकासाच्या नावे बोंब असून शहर भकास झाल्याचे चित्र दिसत आहे. शहराचा ऐतिहासिक शिलालेख तरणतलाव येथे ठेवण्यात आला असून वर्धापनदिनी शिलालेखाची आठवण नेत्यांना होते.

देशाच्या फाळणीवेळी विस्थापित झालेल्या बहुसंख्य सिंधी बांधवांना कल्याणशेजारील ब्रिटिशकालीन लष्करी छावणीच्या बॅरेक व खुल्या जागेवर वसविण्यात आले. विस्थापितांच्या वस्तीचे देशाचे पहिले गव्हर्नर सी. गोपालचारी यांनी ८ आॅगस्ट १९४९ रोजी उल्हास नदीवरून उल्हासनगर नामकरण केले. उद्या शहर ७१ वर्षांचे होत आहे. व्यापारी हबमुळे शहराचे नाव राज्यात नव्हे तर देशात प्रसिद्ध आहे. मात्र, इतर शहरांच्या तुलनेत विकास होण्याऐवजी भकासच झाले आहे. महापालिकेला टी. चंद्रशेखर, आर.डी. शिंदे, रामनाथ सोनवणे, मनोहर हिरे, सुधाकर देशमुख यांच्यासारख्या आक्रमक आयुक्तांची गरज आहे. मात्र, महापालिकेला बहुतांश आयुक्त हे केबिनमध्ये बसून गाडा हाकणारे मिळाल्याने शहराचा विकास खुंटल्याची टीका होत आहे. तसेच प्रतिनियुक्तीवरील अधिकारी महापालिकेला देत नसल्याने वर्ग-१ व २ च्या अधिकाऱ्यांच्या ८० टक्के जागा रिक्त आहेत. यामुळे स्थानिक अधिकाऱ्यांची मक्तेदारी वाढल्याने शहर विकासापासून दूर आहे.शहरातील प्रसिद्ध जीन्स मार्केटला केव्हाच घरघर लागली असून इतर मार्केटची दुरवस्था झाली आहे. बेकायदा बांधकामे नियमित करण्याची प्रक्रिया ठप्प पडली असून रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. वालधुनी नदीकिनारी अतिक्रमण वाढले आहे. राजकीय नेत्यांचा पालिका कारभारात हस्तक्षेप वाढल्याने कोणताही अधिकारी प्रतिनियुक्तीवर येत नाही, अशी येथील परिस्थिती आहे. स्थानिक अधिकाºयांची मक्तेदारी वाढून ते राजकीय नेत्यांच्या हातचे बाहुले बनल्याची टीका होत आहे.शिलालेखाचे होणार पूजनशहराचे नामांतर झालेल्या ऐतिहासिक शिलालेखाचे दरवर्षीप्रमाणे पूजन करणार असल्याची माहिती वालधुनी बिरादरीचे शशिकांत दायमा यांनी दिली. जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांनी आयुक्तांच्या आदेशानुसार कोरोनामुळे कार्यक्रम होणार नसल्याचे स्पष्ट केले.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर