शहरं
Join us  
Trending Stories
1
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
4
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
5
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
6
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
7
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
8
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
9
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
10
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
11
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
12
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
13
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
14
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
15
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
16
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
17
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
18
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
19
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
20
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य

शिवाजी महाराजांचा उभारणार अश्वारुढ पुतळा; भाईंदर पालिकेचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 22:27 IST

दोन कोटी ९५ लाखांचा येणार खर्च, घोडबंदर किल्ल्याची सध्या डागडुजी सुरू

मीरा रोड : घोडबंदर गावातील पुरातन घोडबंदर किल्ल्याकडे जाणारा रस्ता व शहरात प्रवेशासाठी बांधलेल्या नवीन ६० मीटर रस्त्याच्या नाक्यावर महामार्गाजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. घोडबंदर किल्ल्याची डागडुजी सुरू असून मुख्य रस्त्यांच्या जंक्शनमध्येच आता भव्य पुतळा उभारला जाणार आहे.मीरा-भार्इंदर शहराचे काशिमीरा नाका हे मध्य भागातील मुख्य प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा खूप वर्षांपूर्वीच बसवण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक असे या नाक्याचे नामकरण केले आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गाला लागून असणाऱ्या या अश्वारूढ पुतळ्यासमोर आता महामार्गावरील उड्डाणपूल आला आहे. त्यामुळे शहरातील प्रवेशद्वारावर असणारा हा पुतळा उंच व सुशोभित करण्याची मागणी सातत्याने होत असून त्याचे काम प्रलंबित आहे. त्यातच मेट्रोचे काम सुरू झाल्याने भविष्यात या ठिकाणी पुतळ्याचे नियोजन योग्यपणे करावे लागणार आहे.दरम्यान, घोडबंदर किल्ल्याच्या डागडुजी आणि सौंदर्यीकरणाचे काम सुरू केले आहे. त्यामुळे या कामानंतर किल्ल्याकडे नागरिकांसह पर्यटकांची वर्दळ वाढणार आहे. किल्ल्याकडे जाण्यासाठीचा मुख्य मार्ग हा महामार्गावरील सगणाईदेवी मंदिरनाक्यावरून गावात जाणारा रस्ता आहे. तर, सगणाईदेवी मंदिराजवळूनच नव्याने ६० मीटरचा रस्ता हा पहिल्या टप्प्यात घोडबंदर येथील वीज उपकेंद्रापर्यंत बांधून पूर्ण होत आला आहे. हे दोन्ही रस्ते महामार्गाला मिळत असून दोन्ही रस्त्यांच्या जंक्शनमध्ये सुमारे सहा गुंठे इतकी जागा मोकळी राहणार आहे.या त्रिकोणी चौकात शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला आहे. हा पुतळा बसवण्यासाठी पालिकेने निविदा मागवल्या होत्या. निविदा मागवल्या असता पुतळ्यासाठी दोन कोटी ९५ लाख रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव आला आहे.सुशोभीकरणासाठी ६५ लाख ९३ हजारांचा खर्च होणार असून त्यासाठी निविदा मागवल्या जाणार आहेत. या एकूण सुधारित तीन कोटी ६१ लाखांच्या खर्चासाठी प्रशासकीय आणि आर्थिक मान्यतेसाठी आयुक्त बालाजी खतगावकर यांनी प्रस्ताव महासभेसाठी दिलेला आहे.जाणकारांची सल्लागार म्हणून नियुक्ती करामागील महासभा तहकूब झाल्याने ती सभा लागताच त्यात हा प्रस्ताव सर्व नगरसेवक एकमताने मंजूर करतील, असा विश्वास उपमहापौर चंद्रकांत वैती यांनी व्यक्त केला. घोडबंदर किल्ल्याकडे जाणाºया मार्गाच्या प्रमुख जंक्शनवर शिवरायांचा पुतळा उभा राहणे मोठे अभिमानास्पद व आनंदाची गोष्ट आहे. सुमारे ३० फूट उंचीचा हा पुतळा असून त्यासाठी इतिहासातील जाणकारांची सल्लागार म्हणून नियुक्ती करा, अशी सूचना प्रशासनास केली असल्याचे वैती म्हणाले.