शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

उरण येथील उबाठा गटाच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश; मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले

By अजित मांडके | Updated: March 4, 2024 11:31 IST

यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 

ठाणे : रायगड जिल्ह्यातील उरण येथील उबाठा गटाच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथे येऊन शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 

उद्धव ठाकरे यांच्या आजच्या  मावळ लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्याअधिच पक्षातील पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेची वाट धरल्यामुळे उबाठा गटाला हा मोठा धक्का समजला जात आहे. आज आपल्या दौऱ्याची सुरुवात उरण येथून करण्यापूर्वीच उरण मधील पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेची वाट धरली आहे. यात उबाठा गटाचे नवघर पंचायत समिती सदस्य दीपक ठाकूर, उरण पंचायत समितीचे माजी सभापती चंद्रकांत पाटील, उलवे नोडचे शहर प्रमुख प्रथम पाटील, शाखाप्रमुख विजय भिसे आणि युवासेनेचे क्षितिज शिंगरे यांचा समावेश होता.

राज्य सरकारच्या प्रयत्नांनी रायगड जिल्ह्याचा विकास होत असून नेरुळ ते उरण अशी उपनगरी रेल्वेसेवा नुकतीच सुरू झाली आहे. तसेच येत्या वर्षभरात पनवेल येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ देखील सुरू होत असून त्यामुळे अनेक संधी निर्माण होणार आहेत. या संधीचा स्थानिक नागरिकांनी सर्वाधिक फायदा घ्यावा असे मत यावेळी व्यक्त केले. कै. दी. बा. पाटील यांचेच नाव आपण या विमानतळाला देणार असून उरणच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. यावेळी शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक आणि प्रवक्ते नरेश म्हस्के हेदेखील उपस्थित होते.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना