शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

निसर्गातील पानाफुलांप्रमाणे आपले आयुष्य बहरून टाका- नरेश म्हस्के

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2020 01:09 IST

आनंद देणारे एकमेव प्रदर्शन असल्याचे सांगतानाच माणसाने निसर्गातील पानाफुलांप्रमाणे आपले आयुष्य बहरून टाकावे, असे मत महापौर नरेश म्हस्के यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

ठाणे : सांगीतिक थीमवर आधारित असलेले बारावे ‘वृक्षवल्ली २०२०’ हे प्रदर्शन ठाणेकरांना आल्हाददायक, आनंद देणारे एकमेव प्रदर्शन असल्याचे सांगतानाच माणसाने निसर्गातील पानाफुलांप्रमाणे आपले आयुष्य बहरून टाकावे, असे मत महापौर नरेश म्हस्के यांनी शुक्रवारी व्यक्त केले. नागरी क्षेत्रातील झाडांचे जतन व्हावे, वृक्षलागवडीबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, म्हणून ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या बाराव्या वृक्षवल्ली या प्रदर्शनाचे उद्घाटन म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आले.ठाण्याच्या रेमण्ड कंपनीच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या या भव्य प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभास उपमहापौर पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती राम रेपाळे, सभागृह नेते अशोक वैती, विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी, शिवसेना गटनेते दिलीप बारटक्के, गलिच्छ वस्ती निर्मूलन समिती सभापती मंगल कळंबे, वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य व पालिका अधिकारी उपस्थितहोते.पर्यावरणाचा समतोल राखायचा असेल, तर वृक्षलागवडीबरोबरच अशा वृक्ष प्रदर्शनाचे आयोजन करणे गरजेचे आहे. ठाणे महापालिका सातत्याने हे प्रदर्शन आयोजित करत आहे. उद्यान विभागाकडे कमी कर्मचारीवर्ग असूनदेखील या विभागाचे कार्य उल्लेखनीय असल्याचे म्हस्के यांनी सांगितले.प्राधिकरणाच्या माध्यमातून महापालिकेच्या हद्दीमध्ये येणाऱ्या झाडांचे संरक्षण व जतन करणे, दर पाच वर्षांनी वृक्षगणना करणे, वृक्षारोपण करणाºया व्यक्तींना रोपवाटिकेद्वारे रोपं उपलब्ध करून देणे, शहरातील मोकळ्या आणि मोक्याच्या जागी, रस्त्यांलगत, उद्यानांच्या बाजूला, टेकडीवर वृक्षारोपण करून शहरवासीयांना मोकळा श्वास मिळावा आणि हरित ठाण्याची संकल्पना सार्थ ठरावी, यासाठी विशेष प्रयत्न होत आहेत. या प्रयत्नांचा एक भाग म्हणूनच वृक्ष प्राधिकरणाच्या वतीने ‘वृक्षवल्ली’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे.यावेळी रेमण्ड सर्कलपासून ते रेमण्ड मैदानापर्यंत वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले. महापालिकेच्या सर्व शाळांचे विद्यार्थी, विद्यार्थिनी यावेळी मोठ्या संख्येने सहभागी होते.>स्पर्धेत ४५ स्टॉलधारकांसह १०० स्पर्धकांनी नोंदविला सहभागया प्रदर्शनाच्या निमित्ताने महापालिकेच्या वतीने झाडे, फुले, फळे व भाजीपाला यांची स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये एकूण ४५ स्टॉल्सधारकांसह १०० वैयक्तिक स्पर्धकांनी सहभाग नोंदविला आहे. हे प्रदर्शन १० जानेवारी ते १२ जानेवारीदरम्यान सकाळी ८ ते रात्री ९ पर्यंत नागरिकांसाठी खुले राहणार असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.