शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वालधुनी नदीपात्रातील अतिक्रमणे ‘जैसे थे’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 03:47 IST

६५० कोटींचा आराखडा कागदावर । १५ वर्षांत बेकायदा बांधकामे दामदुप्पट वाढली, नदी प्रदूषणावर सर्वांचेच मौन

मुरलीधर भवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : तब्बल १५ वर्षांपूर्वी २६ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीने सह्याद्रीच्या फूटहिल्समधून उगम पावलेल्या वालधुनी नदीला आलेल्या पुराने नदीच्या काठावरील अनेक बेकायदा वस्त्यांना कवेत घेतले होते. गेल्या १५ वर्षांत नदी विकासाची योजना ‘बोलाचीच कढी नि बोलाचाच भात’ ठरली आहे. अतिवृष्टीच्या फटक्याने सरकारी यंत्रणांनी कोणताही धडा घेतला नाही. नदीपात्रातील बेकायदा बांधकामे हटली नाहीत, उलट दामदुप्पट वाढली.वालधुनी नदी ही प्राचीन काळी एक मोठी नदी होती. तिच्या तीरावरच अंबरनाथ येथील प्राचीन शिव मंदिर शिलाहार राजाने इसवी सन १०६० मध्ये उभारले. पुढे जाऊन ब्रिटिशांनी या नदीवर १९२३ साली जीआयपी टँक बांधला. त्यातून कल्याण रेल्वेस्थानकाला पाणीपुरवठा केला जात होता. स्वातंत्र्योत्तर काळात झालेले नागरिकीकरण सुनियोजित नव्हते. त्याच नागरिकीकरणाच्या रेट्यात बेकायदा बांधकामांनी नदीचे पात्र गिळंकृत केले. २००५ साली महापूर आल्याने नदीपात्रातील बेकायदा बांधकामांचा विषय प्रकर्षाने पुढे आला. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी बेकायदा बांधकामे हटविण्याचे आदेश दिले. मात्र, त्याची अंमलबजावणी झाली नाही. मिठी नदीच्या धर्तीवर वालधुनी विकास प्राधिकरण स्थापन करण्याची घोषणा देशमुख यांनी केली होती. २००५ ते २०१४ पर्यंत काँग्रेस आघाडीचे सरकार होते. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाची पूर्तताच केली नाही. केडीएमसीचे तत्कालीन आयुक्त रामनाथ सोनवणे यांनी २०११ मध्ये नदी विकासाचा ६५० कोटींचा आराखडा तयार केला. त्यासाठी सरकारकडे निधी नव्हता. यूपीए सरकारने देशातील प्रदूषित नद्यांच्या विकासाकरिता ९४२ कोटींचा निधी मंजूर केला होता. मात्र, या निधीचा थोडाही हिस्सा वालधुनीच्या विकासाकरिता मिळाला नाही. पुढे देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आले. त्यांनीही या नदी विकासावर मौन साधले. खा. श्रीकांत शिंदे यांनी केंद्रात नदी विकास प्राधिकरणाची अंमलबजावणी करण्याचा मुद्दा उचलून धरला. मात्र, त्याचे पुढे काही झाले नाही. नदीपात्रात बड्या बिल्डरांची बेकायदा बांधकामे उभी आहेत. त्यांनी नदीचा प्रवाह बदलला आहे. वालधुनी नदी ही देशातील सगळ्यात प्रदूषित नदी ठरली आहे.प्रदूषणाविरोधात लढा अद्याप सुरूचनदी प्रदूषणाविरोधात ‘वनशक्ती’ ही पर्यावरण संस्था २०१३ पासून उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, हरित लवाद याठिकाणी न्यायालयीन लढा देत आहे. उल्हास जलबिरादरी, उल्हास नदी बचाव समिती यासारख्या संस्था वालधुनी व उल्हास नदी प्रदूषणाच्या विरोधात लढा देत आहेत. तरीही, नदीपात्रातील अतिक्रमणे व बेकायदा बांधकामे हटली नाही. नदीचे प्रदूषण रोखले गेलेले नाही. १५ वर्षांनंतरही परिस्थिती ‘जैसे थे’च आहे.