शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

जिल्ह्यात ६६ हजार सरकारी भूखंडांवर अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 00:14 IST

प्रशासनाची कारवाई ढिम्म : उल्हासनगरातील सरकारी जागा भूमाफियांच्या ताब्यात, संबंधित विभागाची डोळेझाक

- सुरेश लोखंडे

ठाणे : महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील सरकारी भूखंडांवर सुमारे पाच लाखांपेक्षा जास्त अतिक्रमणे असून त्यावर अनधिकृत बांधकामेही झालेली आहेत. यापैकी जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणातील ६९ हजार २३६ सरकारी भूखंड अतिक्रमणांच्या चक्र व्यूहात आहेत. त्यातील केवळ तीन हजार ४०१ अतिक्रमणे तोडली असून अद्यापही ६५ हजार ८३५ अतिक्रमणे बिनदिक्कत उभी आहेत. यात उल्हासनगरमधील महसूलचे बहुतांशी भूखंड भूमाफियांच्या ताब्यात असून त्याकडे डोळेझाक केली जात आहे. तसेच या अतिक्रमणांमध्ये वनविभाग, एमएमआरडीए, एमआयडीसी, महापालिका-नगरपालिकांसह सिडकोच्या जागेवरील अतिक्रमणांचा समावेश नाही.

राजधानी मुंबईजवळ असलेल्या ठाणे जिल्ह्यातील भूखंडांना आर्थिकदृष्ट्या आगळेवेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यात शासनाचे विविध बहुउद्देशीय विकास प्रकल्प बºयाचदा जागेअभावी टाळले जात आहेत. आताही पंतप्रधान आवास योजनेच्या घरांसाठी जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. मात्र, महसूल विभागाच्या जागांसह महापालिकांच्या भूखंडावर भूमाफियांनी आधीच अतिक्रमण करून कब्जा मिळवलेला आहे. उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील शासकीय जमिनी, तर अशाच बळकावलेल्या आहेत. यामध्ये वालधुनी नदीकाठावरील गोडाउनसह जीन्स कारखाने, म्हारळगावाजवळील केबल कारखाने, बिस्कीट कंपन्या आदींनी बनावट कागदपत्रांद्वारे नोंदी झाल्याचे ऐकायला मिळत आहे. उल्हासनगरमधील बहुतांशी ठिकठिकाणच्या कारखान्यांसाठी शासकीय भूखंड हडप केलेले आहेत. काही भूखंडांना तर कम्पाउंड घातलेले असून केवळ शटर लावलेले आहेत. शटर वर करताच नजर पुरणार नाही, एवढे मोठमोठे भूखंड हडप केलेले दिसतात. रस्त्याच्या कडेवरील मोकळ्या जागा, सार्वजनिक शौचालयांच्या जागा हडप करणे उल्हासनगरातील भूमाफियांसाठी तर क्षुल्लक बाब आहे.

भूमाफियांकडून झालेल्या या अतिक्रमणांना हटवून सरकारी भूखंड मोकळे करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाने एप्रिल २०१३ ला आदेश दिलेले आहेत. त्यासाठी शपथपत्रे घेतलेली आहेत. मात्र, अद्यापही सरकारी भूखंड या चक्र व्यूहातून मुक्त झाले नसल्याचे वास्तवचित्र आजही पाहायला मिळत आहे. महापालिका, नगरपालिकांच्या कार्यक्षेत्राप्रमाणेच एमएमआरडीए, एमआयडीसी, वनखाते आदींच्या नियंत्रणातील भूखंडांचा विचार करता या अतिक्रमणांची संख्या पाचपटपेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. कर्मचारी व स्वतंत्र यंत्रणा नसल्याचा बहाणा आणि पोलीस संरक्षण वेळेवर उपलब्ध नसल्याचे सांगून ग्रामीण भागातील सरकारी भूखंडांवरील बहुतांशी अतिक्रमणे हटवता येत नसल्याचा बागुलबुवा जिल्हा प्रशासनाकडून केला जात आहे. या अतिक्रमणांवर त्वरित कारवाईचे आदेश ग्रामपंचायतींना असतानाही ती होत नाही. याशिवाय, पालिकांकडून त्यांच्या क्षेत्रातील अतिक्रमणांसह अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा बडगा उगारला जातो. मात्र, तीन वेळा झालेल्या जुजबी कारवाईनंतर महापालिकांकडून या अतिक्रमणांसह बांधकामांची कागदोपत्री नोंद घेऊन करवसुलीही केली जाते.

महापालिकांकडून जुजबी कारवाईजिल्ह्यातील जमिनीच्या वाढत्या किमतींमुळे सरकारी भूखंडांचे श्रीखंड सहजपणे पचवण्यासाठी भूमाफियांना सरकारी बाबूंचे सहकार्य मोलाचे ठरत आहे. जिल्ह्यात महापालिका क्षेत्राखालोखाल एमआयडीसी, वनविभाग, एमएमआरडीए या प्राधिकरणाच्या नियंत्रणात वाढत असलेले अतिक्रमण मोठ्या प्रमाणात आहेत. त्यावर गगनचुंबी इमारतीची बांधकामेही झाली आहेत. यातील ज्या अतिक्रमणांविषयी तक्रारी येतात, त्यावर सोयीस्कररीत्या जुजबी कारवाई होते. कारवाईसाठी महापालिका आघाडीवर असली, तरी उर्वरित प्राधिकरण त्यात कमी पडत आहे.पिंपरीतील ९० चाळी जमीनदोस्तजिल्ह्यात सध्या अनधिकृत चाळी मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. एवढेच नव्हे तर गोडाउनची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. याआधीच्या जिल्हाधिकाºयांनी भिवंडीसह टिटवाळा, कल्याण, अंबरनाथ परिसरांतील या बेकायदेशीर बांधकामांना जमीनदोस्त केले. मात्र, त्यातील बहुतांशी काही दिवसांत पुन्हा उभे राहिल्याचे वास्तव आहे. तळोजा-शीळफाट्यावरील ९० चाळी आणि ११ गोडाउनवरही नूतन जिल्हाधिकाºयांनीदेखील कारवाई करून ते जमीनदोस्त केले आहेत.यामुळे पिंपरी गावातील कोयना प्रकल्पग्रस्त गावकºयांनी अखेर मोकळेपणाने श्वास घेतला. या प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीवर मुंब्रा तसेच इतर भागातून आलेल्या व्यावसायिक आणि छोटेमोठे व्यापारी यांनी कब्जा करून अनधिकृत बांधकामे केली होती. यामध्ये या ९० चाळी कोयना प्रकल्पग्रस्तांच्या चार एकर जागेवर बांधण्यात आल्या होत्या. तर, ११ गोडाउन आणि बांधलेली २० बांधकामे ही सहा एकर शासकीय जमिनीवर उभी होती.याविषयीच्या तक्रारींकडे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी वेळीच लक्ष देऊन ही सगळी अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामांवर त्यांनी धडक कारवाई करून आपल्या कामाचा ठसा उमटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, अद्याप ६९ हजार २३६ अतिक्रमणांखाली असलेल्या शेकडो एकरच्या भूखंडांवरील कारवाई मात्र अद्याप कागदोपत्रीच धूळखात पडून असल्याचे निदर्शनास आले आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका