शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते जोडले तरच वाढेल रोजगार, कनेक्टिव्हिटी असेल तरच राज्याचा विकास - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 10:16 IST

ठाण्यातील रेमंड ग्राउंड येथे एमसीएचआय क्रेडाई, ठाणेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या प्रॉपर्टी मेळ्याला शिंदे यांनी हजेरी लावली. ते म्हणाले, यापूर्वीच्या सरकारच्या काळात विकास थांबला होता.

ठाणे : राज्याचा विकास साधायचा असेल तर त्यासाठी रस्ते जोडणी महत्त्वाची आहे. कनेक्टिव्हिटी असेल तरच राज्याचा विकास होतो, शिवाय रोजगारही उपलब्ध होतो, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. त्यानुसार समृद्धी महामार्ग, बोरीवली टनेल आदींसह फ्री वेचा विस्तार फाउंटनपर्यंत करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.ठाण्यातील रेमंड ग्राउंड येथे एमसीएचआय क्रेडाई, ठाणेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या प्रॉपर्टी मेळ्याला शिंदे यांनी हजेरी लावली. ते म्हणाले, यापूर्वीच्या सरकारच्या काळात विकास थांबला होता. परंतु जेव्हापासून सर्वसामान्यांचे सरकार राज्यात आले आहे, तेव्हापासून विकासाला वेग आला आहे. नवनवीन प्रकल्प हाती घेतले जात आहेत, नवनवीन करार केले जात आहेत. विकासाला प्राधान्य दिले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. तुम्ही घर बांधता, घर घेण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. कोणाचे वन, टू, थ्री बीएचके अशी प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते. परंतु ज्याच्या खिशात जेवढे पैसे त्यानुसार घर खरेदीला पसंतीक्रम दिला जातो.  कोविडमध्ये सर्वांना त्रास झाला. मात्र त्या काळात सरकार आणि लोकल बॉडीलादेखील विकासकांनी सहकार्य केले. आपल्या शहराचे आपण काही तरी देणे लागतो या भावनेने काम करणे महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले.युनिफाइड डीसीआरचा फायदा युनिफाइड डीसीआर या नव्या कायद्याचा फायदा झाला आहे. परंतु त्यावेळी बांधकाम व्यावसायिकांचे हित जपतो, म्हणून माझ्यावर टीका झाली. या क्षेत्रातील नेमक्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्याकरिता तशी नियमावली करणे गरजेचे होते. नियमावली केवळ कागदावर राहू नये आणि त्याच्या अंमलबजावणीचा फायदा नागरिक तसेच बांधकाम क्षेत्राला व्हावा, यासाठी बांधकाम संघटनेशी चर्चा केली. शेतीनंतर सर्वाधिक रोजगार देणारे क्षेत्र म्हणून बांधकाम क्षेत्राकडे पाहिले जाते आणि त्यामुळेच या क्षेत्राला सवलती देण्याचे काम केले, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेthaneठाणेState Governmentराज्य सरकार